‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा: पवार

‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा: पवार

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात,

देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या इतिहासाचे अभियानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amrit Mahotsav) अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘हर घर तिरंगा’ (Tricolour every house) हे अभियान राबविण्यात येत आहे.

हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार (Dindori Tehsildar Pankaj Pawar) यांनी केले आहे. या अभियानाबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार व नियोजन सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेस गटविकास अधिकारी जिभाऊ शेवाळे (Group Development Officer Jibhau Shewale),

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे (Taluka Health Officer Dr. Subhash Mandge), नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले (Nagar Panchayat Chief Nagesh Yewale), तालुका कृषी अधिकारी विजय पाटील (Taluka Agriculture Officer Vijay Patil), महिला व बालविकास अधिकारी कव्हाळे (Women and Child Development Officer Kavale), गटशिक्षणधिकारी भास्कर कनोज (Group Education Officer Bhaskar Kanoj) यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी, नायब तहसीलदार उपस्थित होते.

या बैठकीव्दारे तालुका प्रशासनाने स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायकांना/ क्रांतिकारकांच्या त्यागची आठवण ठेवून त्यांचे संस्मरण करण्याच्या भावनेने दिंडोरी तालुक्यातील जनतेने प्रेरित होऊन ‘ हर घर तिरंगा ’ या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद देवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com