‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा : आ.डॉ. आहेर

‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा : आ.डॉ. आहेर

चांदवड । प्रतिनिधी | Chandwad

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान (Sacrifice), योगदान (contribution) देणार्‍या महापुरूषांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राष्ट्रीय एकात्मता (National integration) वृध्दींगत करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करावे, असे आवाहन आ.डॉ. राहुल आहेर (MLA Dr Rahul Aher) यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासंदर्भात केंद्र (central) व राज्य शासनाच्या (State Govt) निर्देशानुसार आ.डॉ. आहेर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची बैठक झाली. यावेळी नागरिकांना दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान आपापल्या घरावर तिरंगा ध्वज (tricolor flag) उभारता यावा, यासाठी ध्वज उपलब्ध करून देण्याबाबत गावनिहाय नियोजन करण्यात आले.

तसेच ध्वज उभारताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन ध्वज उभारल्यानंतर कुटुंबासोबत ‘सेल्फी विथ तिरंगा’ (Selfie with tricolor) काढून गाव व तालुक्याच्या सोशल मीडिया (social media) ग्रुपवर प्रसिद्ध करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

याशिवाय दि. 9 ते 17 ऑगस्टदरम्यान गावनिहाय प्रभातफेरी, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठांचे मार्गदर्शन, महिला मेळावे, बचत गटांना मार्गदर्शन, किशोरी मेळावे, बालगोपाल पंगत, स्वच्छता अभियान (Cleanliness campaign), पर्यावरण संवर्धन (Environmental Conservation), हेरिटेज वॉक (Heritage Walk), मोबाईल वापराचे दुष्परिणाम,

ऑनलाईन व सायबर गुन्ह्यांबाबत कार्यशाळा, सेंद्रिय शेती व शेती कार्यशाळा, शेतकरी मेळावे, लोककलावंतांचे स्वातंत्र्याच्या इतिहासावर आधारित कार्यक्रम, माझा गाव माझा इतिहास असे अनेकविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यात तालुक्यातील सर्व विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग मिळवण्यासाठी तालुकास्तरावरील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचार्‍यांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन आ.डॉ. आहेर यांनी केले. त्यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात सरपंचांना तिरंगा घ्वजांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रांत चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, चांदवड पो.नि. समीर बारवकर, वडनेर भैरव पो.नि. तायडे, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, गटशिक्षणाधिकारी एस.एस. शिंदे आदिंसह तालुक्यातील सरपंच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com