डॉक्टरांचे सेवानिवृत्ती वय 64 करा

आरोग्य मंत्र्यांना संग्राम परिषदेतर्फे निवेदन
डॉक्टरांचे सेवानिवृत्ती वय 64 करा

मनमाड । प्रतिनिधी Malegaon

शासनाने शासकीय रूग्णालयात (Government Hospital) कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त (Retired) होणार्‍या डॉक्टरांच्या (doctor) सेवाकाळाची वयोमर्यादेत केलेली वाढ सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केल्यामुळे राज्यभरातील शेकडो डॉक्टर हे सेवानिवृत्त होणार आहे.

यामुळे आरोग्य व्यवस्था (Health system) पुर्णत: कोलमडून याचा फटका लाखो रूग्णांना बसणार असल्याचे लक्षात घेत शासनाने हिवाळी अधिवेशनात (Winter session) सेवानिवृत्तीचे वय (Retirement age) 64 करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आदिवासी संग्राम परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मच्छिंद्रनाथ बर्डे यांनी केली आहे.

आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Health Minister Dr. Rajesh Tope) यांना सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भात डॉ. बर्डे यांनी निवेदन (memrandum) देत न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्भवणार्‍या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे.

या निवेदनात शासनाने शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून 58 ऐवजी 62 केले होते. मात्र सेवानिवृत्तीच्या वयवाढीमुळे आमच्या प्रमोशनसाठी अन्याय होत असल्याचे सांगत काही डॉक्टरांनी शासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. न्यायालयाने त्यांची मागणी ग्राह्य धरून शासनाने सेवा निवृत्तीच्या वयात केलेली वाढ रद्द केली आहे. या निर्णयानंतर राज्यातील शासकीय रुग्णालयातील शेकडो डॉक्टरांचे वय 58 झाले असल्याने ते सेवानिवृत्त होणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या (corona) पहिल्या आणि दुसर्‍या लाटेने देशभरात धुमाकूळ घातला होता अद्यापही करोना पूर्णपणे आटोक्यात आलेला नसताना आता ओमायक्रोनने (Omycron) धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. राज्यातील आरोग्य विभागात वर्ग-1 आणि वर्ग 2 ची तब्बल 3 हजार 148 पदे रिक्त आहे त्यामुळे कार्यरत असलेले डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडलेला असला तरी करोना काळात त्यांनी आपले जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली आहे.

अगोदरच कामाचा ताण वाढलेला असतांना आता जर शेकडो डॉक्टर, सेवक सेवानिवृत्त झाले तर आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल याचा फटका नागरिकांना बसून एक प्रकारे त्याच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागात डॉक्टरांच्या सेवानिवृत्तचे वय 64 करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर सध्या कार्यरत असलेल्या डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय 64 वर्ष करण्यात यावे, अशी मागणी बर्डे यांनी केली असून अशीच मागणी जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग गट-अ डॉक्टर्स संघटनेने देखील केली असल्याचे डॉ. बर्डे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com