पीक पंचनामे तातडीने करा; परतीच्या पावसाने नुकसान

पीक पंचनामे तातडीने करा; परतीच्या पावसाने नुकसान

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) परतीच्या पावसाने (monsoon) सर्वत्र हाहाकार माजवला. ढगफुटीसारखा (cloudburst) पाऊस पडल्याने हाती आलेले टोमॅटोंसह पिकांचे (tomato crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने

ऐन दिवाळीत व तेजीच्या काळात शेतकर्‍यांचे (farmers) कष्ट पावसाच्या पाण्याने वाया गेल्याने यंदाची शेतकर्‍यांची दिवाळी (diwali) अंधारात जात असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे (panchanama) करत शासनाने अहवाल पाठवावी व शासनाने शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात येत आहे.

मागील ते अडीच वर्षात करोनासारख्या (corona) महामारीने जगभरासह महाराष्ट्रातही (maharashtra) हैदोस घातला. त्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या शेतीमालावर झाला. शेतमालाला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान (financial loss) झाले. यंदा करोनातून सावरल्याने शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र असतांना अचानक निसर्गाचा कोप झाला.

परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान (crop damage) करुन हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. दरवर्षी काही ना काही संकटांना शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागत असल्याने शेतकर्‍यांनी करायचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने (Department of Agriculture) त्वरीत पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.

अंबानेर येथे काल झालेल्या ढगफुटी पावसामुळे शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यात सुद्धा नुकसान होऊन बांधलेल्या विहिरीचे नुकसान झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी.

- संतोष रेहरे, माजी सरपंच अंबानेर

दिंडोरी तालुक्यातील शेतकरी अवकाळी पावसाने प्रचंड नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. हाती आलेले पीक पावसाने उद्ध्वस्त झाली आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तरी कृषी विभागाने लवकरात लवकर झालेल्या शेतीपिकांचे नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन भरपाई मिळवून द्यावी.

- गणेश तिडके, सदस्य ग्रा. पं. जानोरी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com