पीक नुकसानीचे पंचनामे करा

पीक नुकसानीचे पंचनामे करा

वलखेड | वार्ताहर | Valkhed

शेतकर्‍यांचे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झालेल्या नुकसानीचे (Damage) पंचनामे होऊन भरपाई मिळावी व केंद्राने त्वरित गॅस दरवाढ कमी करावी या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले...

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) अवकाळी पावसाचा शेतकर्‍यांना (Farmers)मोठा फटका बसला असून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यामुळे कांदा, गहू, हरभरा, भुईसपाट झाले आहे. आंब्याच्या मोहराचे कूज व बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फळ व मोहराची गळ झाली तसेच द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान होऊन द्राक्षाचे मणी तडकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरकारने पंचनामे करून त्वरित भरपाई द्यावी.

तसेच कांदा (Onion) व इतर शेतीमालाला योग्य भाव मिळावा व गॅस, पेट्रोल, डिझेल व खतांच्या किमती वाढल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या झालेल्या दरवाढीमुळे नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे बिघडले आहे. तरी केंद्राने त्वरित दरवाढ कमी करावी, अशी मागणी दिंडोरी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने दरवाढीचा निषेध करत तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, या निवेदनावर उपजिल्हा संघटक सतीश देशमुख, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, तालुका संघटक अरुण गायकवाड, युवा जिल्हाप्रमुख नदीम सय्यद, उपजिल्हाधिकारी संगम देशमुख, युवा तालुकाप्रमुख नीलेश शिंदे, शहरप्रमुख संतोष मुरकुटे, अंबादास गांगुर्डे, नारायण राजगुरू यांच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com