सभासद नोंदणी अभियान यशस्वी करा : ठाकरे

सभासद नोंदणी अभियान यशस्वी करा : ठाकरे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

पक्ष संघटन मजबूत करण्यासह आगामी निवडणुकांना सक्षमतेने सामोरे जाण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रदेश काँग्रेस कमेटीतर्फे (congress committee) नवीन सभासद नोंदणी अभियानास (Member Registration Campaign) प्रारंभ करण्यात आला आहे. शहरासह तालुक्यात हे अभियान यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी गावांसह वाडी-वस्तींवर जावून सभासद नोंदणीबरोबरच जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून सक्रिय व्हावे, असे आवाहन काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे (Congress taluka president Dr. Rajendra Thackeray) यांनी येथे बोलतांना केले.

येथील तालुका काँग्रेस कमेटीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या निर्देशनानुसार व जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पहिल्याच दिवशी 135 नवीन सभासदांची नोंदणी अभियानांतर्गत करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांची नवीन सभासद नोंदणी अभियानामागचा उद्देश विशद केला. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासह आगामी जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समितीसह (panchayat samiti) विविध संस्थांच्या निवडणुकांना पक्षास सक्षमतेने सामोरे जाता यावे या दृष्टिकोनातून हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

त्यामुळे तालुक्यातील 99 गावांसह शहरातील संगमेश्वर (sangameshwar), कलेक्टरपट्टा, कॅम्प, रमजानपुरा, म्हाळदे शिवारात सभासद नोंदणी अभियान पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राबवावे. ग्रामीण भागात गावांसह वाडी-वस्तींवर जावून सभासद नोंदणी करावयाची आहे. या अभियानातच जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून पदाधिकार्‍यांतर्फे पाठपुरावा केला जाईल.

आगामी निवडणुकांना कसे सामोरे जायचे याचा निर्णय पक्ष नेतृत्वातर्फे घेतला जाईल. परंतू स्वबळावर लढण्याची तयारी देखील आपण ठेवली पाहिजे यासाठी गावागावात मोठ्या प्रमाणात नवीन सभासदांची नोंदणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावी, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी शेवटी बोलतांना केले. यावेळी काँग्रेस ज्येष्ठ नेते एस.एस. देवरे. दत्तू खैरनार. वाय.के. खैरनार, सतीश पगार. डॉ अरुण पठाडे. संदीप निकम. दत्तात्रेय वडकते. गुलाब सोनवणे. किरण निकम, संजय खैरनार. संदीप ठाकरे. निलेश थोरात आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com