मेक इन इंडिया व मेड इन इंडियामुळे संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख: गडकरी

मेक इन इंडिया व मेड इन इंडियामुळे संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख: गडकरी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

२०१४ पुर्वी भारत (india) शस्त्र सामुग्रीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होता मात्र नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान (Prime Minister) झाल्यानंतर मेक इन इंडिया (Make in India) व मेड इन इंडियाची (Made in India) सुरवात झाल्याने

संरक्षण दलातील (Defense Force) विविध साधन सामग्री व संरक्षण साहित्य (Defense materials) हे आपल्याच देशात तयार होत असल्याने संरक्षण सामग्री निर्यात (export) करणारा देश म्हणून भारताची ओळख आता निर्माण झाली असल्याने

हि आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. गोल्फ क्लब मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या "नो योर आर्मी" (Know Your Army) या दोन दिवसीय सैन्य दलातील शस्त्र व तोफांचे प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar), खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse), ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, बंदरे विकास व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, स्कुल ऑफ आर्टीलरी चे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर, तोफखाना केंद्राचे ब्रिगेडियर ए. रागेश, महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह अर्टीलरी केंद्राचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हवेत फुगे सोडून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तुफान, शायनिंग स्टार, मॅक्स, साहिबा या चार प्रशिक्षित सैनिकी अश्वांच्या सहाय्याने हवालदार प्रधान चौधरी, राजकुमार, नायक दिलीपकुमार, लान्स नायक अमोल सानप यांनी व्यासपीठासमोर अश्वाहून येत झेंडा रोवून लष्करी थाटात मान्यवरांना सॅल्युट केला.

यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले कि, आपल्या देशाच्या संरक्षणाची ताकद वाढविण्यात थलसेना (Army), वायुसेना (air force) व नौसेना (Navy) या तिन्ही दलांचा मोठा वाटा आहे. केंद्र सरकारच्या अग्नीवर (agniveer) या संकल्पनेतून ५ हजार ६०० अग्नीवर तोफखाना केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. ज्ञान ही एक शक्ती आहे. या ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देऊन संरक्षण दलात नवनवीन संशोधन करण्यात येत आहे.

यामुळे संरक्षण क्षेत्रात (Defense sector) तयार करण्यात येणाऱ्या साधन सामग्रीच्या निर्यातीतून देशात नवीन रोजगार निर्मितीला चालना मिळत असून नाशिकमधील एचएएल (HAL) येथे निर्माण होणारे संरक्षण साहित्य, देवळाली कॅम्प (Devali Camp) व नाशिक येथे संरक्षण क्षेत्रातील मोठी व्यवस्था आहे, या पार्श्वभूमीवर येथे रोजगार निर्मितीसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.

यातून आपण संरक्षण क्षेत्रात सक्षम आणि सामर्थ्यवान झाल्याने देशाचे सर्वच बाबतीत रक्षण करणे शक्य आहे. नव तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याच देशात निर्मिती करण्यात येणारे संरक्षण दलातील साधन सामग्री, सैन्यात दिले जाणारे प्रशिक्षण या माध्यमातूनच देशाचे संरक्षण कसे केले जाते. यासर्व गोष्टींची माहिती सर्व सामन्यांना, नव युवकांना होण्यासाठी या नो युवर आर्मी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी तोफांचे प्रदर्शन बघण्यासाठी मैदानात नाशिकमधील विविध शाळांसह महाविद्यालयाचे व भरतीची तयारी करणाऱ्या विविध अकेडमीमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'भारत माता की जय..', 'वंदे मातरम..'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल एस हरिमोहन अय्यर यांनी तर खासदार हेमंत गोडसे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com