आगामी निवडणुकीत पंचवटीतून इतिहास घडवा

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे आवाहन
आगामी निवडणुकीत पंचवटीतून इतिहास घडवा

पंचवटी | वार्ताहर | Panchavati

म्हसरूळ (Mhasrul), मेरी (Meri) आणि पंचवटी (Panchavati) परिसरात शिवसेनेची (Shivsena) ताकद वाढली असून त्याचा फायदा करून घ्या. आगामी महापालिका निवडणुकीत (NMC Elections) या परिसरातून पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून इतिहास घडवा, असे आवाहन शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी केले...

प्रभाग क्र.१ मधील शिवसेनेच्या सर्व शाखा आणि बुथ प्रमुखांची बैठक म्हसरूळच्या गावराण हॉटेल ( Hotel Gavaran) येथे आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी मार्गदर्शन करतांना बडगुजर बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महिला आघाडीच्या शोभा मगर, विधानसभा संघटक विशाल कदम, भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, लक्ष्मी ताठे, नगरसेवक सुनील गोडसे, राजेंद्र वाकसरे आदी उपस्थित होते.

आगामी महापालिका निवडणुका म्हणजे शिवसेनेसाठी एकप्रकारे सत्त्वपरीक्षाच आहे. एकहाती सत्ता हेच शिवसेनेचे खरे ध्येय असून त्यामुळेच शाखा आणि बूथप्रमुखांची जबाबदारी वाढली आहे.

त्यांनी शिवसेनेचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे आमजनतेपर्यंत पोहोचवावीत, पक्ष संघटना अधिक मजबूत करावी. विशेष करून युवा आणि महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात पक्षात आणण्यासाठी आपली सर्व कसब पणास लावा, असेदेखील बडगुजर म्हणाले.

शिवसेनेतर्फे राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानाची माहिती दत्ता गायकवाड आणि वसंत गिते यांनी दिली. सूत्रसंचालन समनव्यक सुनील निरगुडे यांनी केले. आभार सुनील जाधव यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com