पेसा क्षेत्रातील जि.प. आरक्षणात बदल करा

कळवण तालुका आदिवासी बचाव अभियानातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पेसा क्षेत्रातील जि.प. आरक्षणात बदल करा

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

पेसा क्षेत्रातील जि.प. आरक्षणात (zilha parishad reservation) बदल करा यासह विविध मागण्यांचे निवेदन (memorandum) कळवण तालुका आदिवासी बचाव अभियानाच्या (Kalwan Taluka Tribal Rescue Mission) वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना मालेगाव (Malegaon) येथे देण्यात आले.

निवेदनात (memorandum) म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), पेठ (peth), सुरगाणा (surgana), कळवण (kalwan) हे तालुके 100 टक्के पेसा क्षेत्रातील आदिवासी तालुके आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद (zilha parishad) आरक्षण (reservation) सोडतीत या तालुक्यातील सर्व जि. प. जागा सर्वसाधारण व नामाप्र प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांवर (tribal community) अन्याय झाला आहे. ज्या गटात ज्या गटात सर्वसाधारण मतदारांची (voter) संख्या जास्त आहे.

त्याठिकाणी सर्वसाधारण व ओबीसी आरक्षण (OBC reservation) जाहीर करावे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली असून तात्काळ हे आरक्षण करण्यात यावे तसेच नियोजित मालेगाव (malegaon) जिल्ह्यात कळवण तालुक्याचा (kalwan taluka) समावेश करू, नये अतिवृष्टीमुळे (heavy rain) तालुक्यातील सर्वच शेत माल, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष राम चौरे, चणकापूरचे सरपंच ज्ञानदेव पवार, दह्याने ग्राप माजी सरपंच बेबीलाल पालवी, आदिवासी बचाव अभियानाचे संपर्कप्रमुख जयराम गावित यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com