विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरुळीत करा

मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांची मागणी
विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरुळीत करा

सिन्नर। वार्ताहर Sinnar

तालुक्यातील सर्व विद्यालये (schools) सुरु झाली असून ग्रामीण भागातून शहरात व इतर ठिकाणी शाळेत जाण्यासाठी बस सेवा (bus service) सुरुळीत करण्याची मागणी मनसेचे (MNS) तालुकाध्यक्ष विलास सांगळे (vilas sangle) व पदाधिकार्‍यांनी सिन्नर आगाराचे व्यवस्थापक भुषण सुर्यवंशी यांना निवदेन देत केली आहे.

कोरोनामुळे (corona) गेली दिड वर्ष सर्व शाळा बंद होत्या. मात्र, 4 ऑक्टोंबरपासून शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी बस सेवा सुरळीतपणे चालू ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थी (students), पालक, नोकरदार वर्गाने मनसेच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडल्या होत्या.

काही विद्यार्थ्यांना खाजगी क्लास असल्यामुळे त्यांना सकाळी पावणे सात वाजता बस सेवा उपलब्ध करावी, शाळेनुसार येण्या-जाण्यासाठी बस सुविधा द्यावी, विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही निवेदनात करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश येलमामे, जिल्हा संघटक तुषार कपोते, तालुका संघटक चेतन दराडे, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोडके, पांडुरंग माळी, अमित कांबळे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com