नदीजोड प्रकल्पाशी सांगड घालून आराखडा बनवा

आ. माणिकराव कोकाटे यांची सूचना
नदीजोड प्रकल्पाशी सांगड घालून आराखडा बनवा

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी (Low Rain) असल्याने अटल भूजल योजनेत (Atal Groundwater Scheme) शासनाने सुचविलेली कामे करून फायदा होणार नाही. त्यामूळे नदीजोड प्रकल्पाशी (River confluence project) सांगड घालून अटल भूजल योजनेचा आराखडा बनवावा व त्यानुसार विविध विभागांनी आपल्या कामाचे प्रस्ताव बनवावेत अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी भूजल सर्वेक्षणसह (Groundwater survey) जलसंधारण व जलसंपदा विभागाच्या (Department of Water Conservation and Water Resources) अधिकार्‍यांना केल्या आहेत.

जलसंपदा विभागाच्या नाशिक (Nashik) येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिररराव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत भूजल सर्व्हेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बिडवाल (Senior Geologist Jeevan Bidwal), जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक ( Water Resources Superintendent Engineer Arun Naik), जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता अंकिता वाघमारे, सरोज जगताप, जलसंधारणचे उपअभियंता डावरे, अविनाश लोखंडे उपस्थित होते.

अटल भूजल योजनेत सिन्नर तालुक्यातील 79 ग्रामपंचायती अंतर्गत 87 गावांचा समावेश झाला आहे. मात्र, या योजनेत जी कामे प्रस्तावित आहेत, ती पूर्वीच झाल्याने ती नव्याने करूनही फारसा फायदा होणार नाही. सिन्नरच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे ज्या भागात जास्त पाऊस पडतो, तेथील पाणी व प्रस्तावित नदी जोड प्रकल्पांतर्गतचे 7 हजार एमसीएफटी पाणी गावो-गावच्या शिवारात पोहचवण्यासाठी अटल भूजल योजनेच्या प्रकल्प अहवालात बदल करण्यासाठी आमदार कोकाटे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

अधिकार्‍यांनी सर्व गावात पाणी उपलब्ध होईल,अशा प्रकारे सर्वेक्षणाचे काम करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या. नदीजोड प्रकल्पांतर्गत कोनांबे धरणात पाणी आल्यानंतर तेथून पुढे ते कालवे व अन्य माध्यमातून वितरीत करण्याबाबतचे सर्वेक्षण करून त्याचाही प्रकल्प अहवाल बनवावा, अशी सूचना कोकाटे यांनी केली. त्यानंतर अहिरराव यांनीही अधिकार्‍यांना दोन्ही योजनांची सांगड घालून एक डीपीआर बनवा, असे निर्देश दिले. दिवाळीपर्यंत हा डीपीआर बनविण्याचे आश्वासन त्यांनी आमदार कोकाटे यांना दिले.

जलसंधारण विभागाने प्रस्तावित केलेल्या 25 हून अधिक योजनांचे सादरीकरण उपभियंता डावरे व अविनाश लोखंडे यांनी यावेळी केले. त्यातील कुंदेवाडी ते सायाळे व खोपडी ते मिरगाव पूर कालवा या मंजूर असलेल्या दोन योजनांसह बंधारे व नाल्यांमध्ये पाणी सोडण्यासाठी उपसा सिंचन योजना (Upsa Sincha Yojna) प्रस्तावित केल्या आहेत.

त्या पुढील प्रमाणे- निमगाव व खडांगळी या गावांसाठी निमगाव कोटा बंधार्‍यातून पंचाळे डांबरनाला, किर्तांगळी व वडांगळीसाठी किर्तांगळी कोटा बंधार्‍यातून आगनमळा, पाडळी व बोगीरवाडीसाठी म्हाळुंगी नदीवरील बंधार्‍यातून बोगीरवाडी, वडांगळी येथे चाळीशी नाला व कासारी नाला येथे कोटा बंधार्‍यातून, गुळवंच व निमगाव सिन्नर (Sinnar) येथे कोटा बंधारा निमगाव येथून, कोटा बंधारा देवपूर येथून धारणगाव व देवपूरसाठी डांबरनाला येथे, खोपडी देवनदीवरून खोपडी खुर्द पाझर तलावात आदी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com