
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (International Year of Nutritious Cereals) म्हणून घोषित केले आहे.
त्यानुसार मकर संक्रांती (Makar Sankranti) - भोगी (bhogi) हा सणाचा (festival) दिवस दरवर्षी राज्यात पौष्टीक तृणधान्य दिवस (Nutritious Cereal Day) म्हणून साजरा करण्यात यावा, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे (District Superintendent Agriculture Officer Vivek Sonwane) यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 (International Year of Nutritious Cereals 2023) च्या अनुषंगाने कृषि विभागामार्फत (Department of Agriculture) पौष्टीक तृणधान्य पिकाचे आहारातील महत्व, त्याचे फायदे सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासोबतच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर (health) आधारित चर्चासत्रांचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान,
तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्यांपासून बनविण्यात येणारे पदार्थ याची माहिती देण्यासाठी प्रगतशिल शेतकरी, आहारतज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे नियोजन कृषी सहाय्यक करणार आहेत. जिल्ह्यात मकर संक्रांती-भोगी हा सणाचा दिवस पौष्टीक तृणधान्य दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.