पाथरे येथील मेजर गीते यांचे निधन

आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार
पाथरे येथील मेजर गीते यांचे निधन

पाथरे | Pathre

भारतीय सैन्यदलात मेजर पदावर कार्यरत असलेले संतोष साहेबराव गीते यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

आठ दिवसांपूर्वी सुट्टी संपवून मेजर गीते बेळगाव येथील आपल्या कार्यस्थळावर जात असताना प्रवासातच त्यांची तब्येत बिघडल्याने पुणे येथील लष्करी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत असतानाच दोन दिवसांपूर्वी प्रकृती अधिकच खालावली त्यातच मेजर गीते यांची प्राणज्योत मालवली.

आज सायंकाळी पाच वाजता लष्करी इतमामात पाथरे येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पाथरे बुद्रुक चे सरपंच सविता नरोडे यांनी दिली आहे. त्यांचे पश्चात आई वडील दोन मुले दोन बहिणी असा परिवार आहे. मेजर गीते यांच्या निधनाने पाथरे परिसरावर शोककळा पसरली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com