पाथर्डी परिसरात भरधाव बसला भीषण अपघात

पाथर्डी परिसरात भरधाव बसला भीषण अपघात

इंदिरानगर | वार्ताहर

कामगारांची वाहतूक (workers bus) करणाऱ्या बसला पाथर्डी परिसरात (Pathardi Area) भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरीदेखील बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे...

अधिक माहिती अशी की, कंपनी कामगारांची (Company Workers) वाहतूक करणारी बस पाथर्डीकडे चालली होती. पाथर्डी गावाच्या सर्कलनजीक असलेल्या रिद्धी सिद्धी अपार्टमेंट समोर रोडच्या खाली बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन आदळली.

चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने बस मध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे (Indiranagar police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल असून पुढील तपास सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com