'त्या' गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित जेरबंद

गुंडाविरोधी पथकाची कामगिरी
'त्या' गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलीस (police) रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर नवीन नाशकातील बाजीप्रभू चौकात भर दिवसा गोळीबार (firing) करणाऱ्या मुख्य संशयितासह एकास गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.

अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत (दि.१६) भरदिवसा राकेश कोष्टी या सराईतावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यातील मुख्य सूत्रधार घटनेनंतर फरार होता.

'त्या' गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित जेरबंद
Nashik : बँकेच्या शाखेत कॅशिअरकडून अपहार; गुन्हा दाखल

या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde), उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव यांनी गुंडा विरोधी पथकाला आदेशीत केले होते.

'त्या' गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित जेरबंद
कालिका माता मंदिरात हापूस आंब्यांची आरास

सदर प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा गोदावरी नदीच्या (Godavari River) परिसरात नाशिकरोड येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,अंमलदार मलंग गुंजाळ, डी.के. पवार, प्रदिप ठाकरे आदींच्या पथकाने सापळा रचून संशयित सागर पवार (२८,रा. गणेशवाडी, पंचवटी, नाशिक), पवन पुजारी (२३,रा. तारवाला नगर पंचवटी नाशिक) यांना अटक करून पुढील तपास कामी अंबड पोलिसांच्या हवाली केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com