
देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devali Camp
भगूर (Bhagur) हे शहर क्रांतिकारकांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु या भगूर शहरातील मुख्य केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाची (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) अवस्था दयनीय झाली असून याकडे पालिका प्रशासनाने (Municipal administration) लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
भगूर ही सावरकरांची जन्मभूमी असल्याने देशप्रेमींचा व पर्यटकांचा (Tourists) येथे नेहमी राबता असतो. तसेच शहरांत कुठलाही कार्यक्रम असो छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), स्वा. सावरकर (Swatantraveer Savarkar) यांना अभिवादन करूनच कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते. मात्र या चौकातील महाराजांच्या पुतळ्याभोवती संरक्षक जाळी किंवा तत्सम सुविधा नसल्याने त्याचा ताबा भटक्या कुत्र्यानी तसेच इतरत्रही खाद्य पदार्थ विक्री गाड्यांची घेतल्याने
थोर क्रांतिकारक झाकले जात असल्याने नागरिकांत कमालीचा संताप व्यक्त होत आहे. यास संरक्षक जाळी बसविण्यासाठी शहरातील समाजसेवक कैलास भोर यांनी वेळोवेळी प्रशासनास निवेदन (memorandum) देऊन मागणी केली. परंतु पालिकेकडून परवानगी मिळत नसल्याची खंत भोर यांनी व्यक्त केली. तसेच भाजपाचे निलेश हासे यांनीही या परस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली.
पालिकेकडून राष्ट्र पुरुषांची पुतळ्याची व्यवस्था राखली जात नसेल तर मी स्वतः जनसेवक म्हणून ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे, असे भोर यांनी सांगितले.