सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

महिंद्र कंपनीतील कामगारांची अंतर्गत युनियन महिद्र एम्प्लॉईजच्या त्रैवोर्षीक निवडणूकीतील 8 जागांसाठी 73 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे दोन पॅनलमध्ये होणारी लढत प्रत्येक जागेसाठी बहुरंगी झाली काल प्रचाराच्या तोफा सायंकाळी 5 वाजता थंडावल्या. या गदारोळात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याने प्रशासनाने सूस्कारा सोडला आहे. शनिवारी सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.

कामगार संघटनांच्या निवडणूका वेतनवाढ करारापर्यंत लांबवण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेला होता. त्या आधारावर विद्यमान पदाधिकार्यांनी संपूर्ण दूसरी टर्म वाढवून घेतल्याने आरोप प्रत्यारोपांचा धुराळा मोठ्या प्रमाणात उहाला होता. न्यायालयाच्या निवाड्यानंतर निवडणूका लागल्याने या निवडणूका वादातित होतील अशी आशंका कामगार व्यक्त करीत होते.

मात्र दोनही गटांनी दाखवलेल्या संयमाच्या भूमिकेमुळे प्रचाराची रणधूमाळी शांततेत समाप्त झाली. प्रत्यक्षात न्यायालयीन लढा देणारे एकाच पॅनलने उभे राहण्याची शक्यता होती. मात्र प्रत्येक पोस्टसाठी 10 ते 15 उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येकाने पॅनलपेक्षा आपला वैयक्तीक प्रचार करण्यावरच भर दिल्याचे दिसून आले.या निवडणूकीत मतदार संख्या दोन हजार तिनशे एवढी आहे. वैयक्तीक पातळीवर मतदान असल्याने मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शनिवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजे दरम्यान मतदान करता येणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी केली जाणार आहे. निकालही ताबडतोबीने जाहीर केले जाणार असल्याचे प्रशासनाकहून समजते.