महिंद्रा लवकरच कोविड रुग्णालय सुरू करणार

आयएमए च्या माध्यमातून जागेचा शोध सूरु
महिंद्रा लवकरच कोविड रुग्णालय सुरू करणार
करोना

सातपूर | Satpur

शहर आणि जिल्ह्याची हर्ष वाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे नाशिकमध्ये कोरोना उपचार रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू केला आहे.

स्वतःचे कामगार आणि त्यांचे कुटुंबीयांसोबत व्हेन्डर्ससाठी शंभर खाटांचे रुग्णालय कंपनीला सुरू करायचे आहे. त्यासाठी आय. एम. ए. च्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरात बंद पडलेल्या मॉल्सची जागा सुचविली होती.

एकीकडे शहरातील खासगी डॉक्टरांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून शंभर ऑक्सिजन सिलिंडरची बँक सुरू केलीय.

त्र्यंबकेश्वर नाका भागातील हा मॉल असून, त्याला दोन्ही बाजूने प्रवेश आहे. त्या मुळे ही जागा सोईची होईल. महिंद्र कंपनीतर्फे शहरात कोरोना रुग्णालय सुरू होण्याने आरोग्य सेवांमध्ये भर पडण्यास मदत होणार आहे.

सद्य:स्थितीत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने खासगी रुग्णालयांमधून उपचारासाठी खाटा, ऑक्सिजन खाट, व्हेंटिलेटर मिळणे मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत नव्याने शंभर खाटांची सोय होत असल्यास त्यास मदत करायला हवी, अशी भूमिका स्वीकारून आय. एम. ए. च्या पदाधिकाऱ्यांनी महिंद्रच्या रुग्णालयासाठी जागा शोधण्यात पुढाकार घेतला आहे.

ऑक्सिजन एक्स्प्रेसने नाशिकमध्ये लिक्विड ऑक्सिजनचे दोन टँकर आल्याचा बराच गाजावाजा झाला. मात्र नाशिकसाठी ५० टन लिक्विड ऑक्सिजन मिळणार हे आदल्या दिवशी सांगण्यात आले असताना प्रत्यक्षात २४ टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध झाले. हा ऑक्सिजन कुठं गेला? हा प्रश्न खासगी डॉक्टर उपस्थित करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com