सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

नाशिक औद्योगिक वसाहतीतील उद्योग क्षेत्राची अर्थ वाहीनी असलेल्यामहिंद्र कंपनीतील कामगारांची अंतर्गत कामगार संघटना महिंद्र एम्प्लॉईज युनियनची त्रैवार्षिक निवडणूक प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे जाहीर करण्यात आली असून,न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार दि. 13 फेब्रुवारी रोजी निवडणूक मतदान व मतमोजणी होणार आहे.

कामगार संघटनेच्या सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेल्या नोटीस द्वारे सभासदांना ही सूचना देण्यात आली आहे. यामुळे कंपनीतील राजकिय वातावरण ढवळून निघायला सूरूवात झाली आहे. विद्यमान महिंद्रा युनियनचा कार्यकाळ 17 जुलै 2020 रोजी संपला होता.

परंतु कोरोना संसर्गजन्य काळामुळे निवडणूक घेण्यास परवानगी दिली जात नव्हती. या बाबतीत न्यायालयाच्या परवानगीनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या निवडणूकीसाठी एकूण सर्व 8 पदाधिकारी व 2 कमिटी सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी कंपनीतील 2 हजार 200 कामगार सदस्य निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

निवडणूक कालावधी मध्ये सर्व सभासदांनी कोविड नियमांचे काटेकोरपणे व शांतपणे पालन करून निवडणूक ज्या शांतपणे यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

जाहिर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार

- उमेदवारी अर्ज विक्री : दि.3 व 4 फेब्रुवारी स.10 ते साय.5 पर्यंत

- उमेदवारा अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि.5 फेब्रुवारी साय. 5 पर्यंत . - उमेदवार अर्जाची छाननी अंतिम मुदत दि.6 फेब्रुवारी

- अंतिम यादी जाहीर करण्याची मुदत दि. 8 फेब्रुवारी

- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि.9 फेब्रुवारी सायं. 5 वाजेपर्यंत

- पात्र उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध मुदत दि. 10 फेब्रुवारी

-निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान दि 13 फेब्रुवारी स 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत . - मतमोजणीची दि.13 फेब्रुवारी रोजी मतदान संपल्यानंतर लगेचच