केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृती समितीवर नाशिकचे छोरिया

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृती समितीवर नाशिकचे छोरिया

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष तथा भगर उद्योजक महेंद्र छोरिया (Mahendra Chhoriya) यांची केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Union Ministry of Agriculture) निवड केली आहे...

तृणधान्य मानवी शरिराला अत्यंत पोषक असून त्याची जनजागृती करण्यासाठी २०२३ हे वर्ष मिलेट (तृणधान्य वर्ष) म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. यासाठी कृषी मंत्रालयाने तज्ज्ञांची कृती समिती गठीत केली आहे. या समितीत नाशिकच्या महेंद्र छोरिया यांची निवड करण्यात आली आहे.

छोरिया यांच्या नाशिकमध्ये 3 भगर मिल आहेत. तसेच, ते भगर मिल असोसिएशनच्या माध्यमातून अतिशय सक्रीय काम करीत आहेत. त्यांना नुकताच केंद्रीय स्तरावर पोषक अनाज पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.

हायटेक्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (एचआयसीसी) हैदराबाद येथे न्युट्रिहब, आयआयएमआर यांच्यातर्फे न्यूट्री-सेरियल्स मल्टी-स्टेकहोल्डर्स मेगा कन्व्हेन्शन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

भगर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अत्याधुनीकरण केल्याबद्दल छोरिया यांना मानांकन मिळाले. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते महाराष्ट्रातील एकमेव आणि सर्वप्रथम उद्योजक झाले आहेत.

२०२३ या वर्षाचा उद्देश हा प्रामुख्याने तृणधान्याच्या इको सिस्टीममध्ये काम करणार्‍या भागधारकांना व्यासपीठावर एकत्र आणणे, तसेच उत्पादक आणि ग्राहकांमध्ये तृण धान्याबद्दल जागरूकता निर्माण करणे असा आहे.

Related Stories

No stories found.