आयर्नमॅन छोरिया यांना पोषक अनाज पुरस्कार

आयर्नमॅन छोरिया यांना पोषक अनाज पुरस्कार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकचे व्यावसायिक आणि आयर्नमॅन महेंद्र छोरिया (Mahendra Chhoriya) यांना पोषक अनाज पुरस्काराने गौरविण्यात आले आहे…

हायटेक्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (HICC) हैदराबाद (Hyderabad) येथे न्युट्रिहब, आयआयएमआर यांच्यातर्फे "न्यूट्री-सेरियल्स मल्टी-स्टेकहोल्डर्स मेगा कन्व्हेन्शन" हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ‘पोषक अनाज’ पुरस्कारासाठी महेंद्र छोरिया यांना भगर उत्पादनाच्या प्रक्रियेत अत्याधुनीकरण केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते महाराष्ट्रातील एकमेव उद्योजक झाले आहेत. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), कृषि आयुक्त धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांनी छोरिया यांचे कौतुक केले आहे.

हा कार्यक्रम UNGA च्या 2023 च्या आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष (International Year of Millets 2023") म्हणून घोषित करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

तृण धान्याच्या इको-सिस्टीममध्ये काम करणाऱ्या भागधारकांना व्यासपीठावर एकत्र आणणे, तसेच उत्पादक आणि ग्राहकांमध्ये तृण धान्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, असा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

महाराष्ट्रातील तृण धान्य पिकविणारे शेतकरी, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योजक तसेच प्रामुख्याने आरोग्य जपण्यासाठी तृण धान्याचा आहारात वापर करणारे सर्व ग्राहक यांचाही हा सन्मान आहे.

- महेंद्र छोरिया, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com