उद्यापासून वीज कामगारांचे काम बंद आंदोलन

वीज कर्मचारी अभियंते संयुक्त कृती समितीची घोषणा
उद्यापासून वीज कामगारांचे काम बंद आंदोलन

सातपूर | Satpur

वीज कामगार, अभियंते व अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा व मेडिक्लेम योजनेला परस्पर नेमलेल्या टिपीए ला तात्काळ बदलावे या मागण्यांसाठी सोमवार पासून(दि.२४) काम बंद आंदोलन छेडले जाणार असल्याचे सांगितले आहे.

वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समितीसमितीने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

सोमवारपासून (दि.२४) कामबंद आंदोलनाचा करण्याचा निर्णय कृती समितीत सहभागी ६ संघटनांनी घेतला असून, आंदोनल काळात हॉस्पिटल व इतर अत्यावश्यक सेवांनाच वीज सुरळीत काम करण्यात येईल. इतर कोणतेही काम करण्यात येणार नाही.

आंदोलनामुळे औद्योगिक शांतता भंग झाली तर त्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही पत्रकात दिला आहे.

वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची (दि.१५) ऑनलाईन कॉन्फरन्स झाली होती. त्या बैठकीत राज्य सरकारने फ्रंटवर काम करणारेे विज कामगार, अभियंते व अधिकारी व कंत्राटी कामगार यांना संघटना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा व प्राधान्याने लसीकरण करावे ही मागणी शासन प्रशासनाकडे केली होती. मात्र सरकार व प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेकड़ो कामगार कामगार कुटुंबीय बाधित झालेले असल्याचे पत्रकात नमूद केले आहे

गेल्या मारामारीत वीज कामगार बाबत ऊर्जा विभाग व महाराष्ट्र शासनाने दूर्लक्ष केले असताना सुध्दा कोराना महामारीत वीज मार्च महिन्यापासून जोखिम पत्करून आजाराचा मुकाबला करत अविरत २४ तास वीज पुरवठा सुरळीत ठेवला. तात्काळ सेवा देत असताना ४०० च्यावर वीज कामगार अभियंते व कंत्राटी कामगार मृत्यू पावलेले आहेत तर हजारो कामगार व त्यांचे कुटुंब आजाराने ग्रस्त आहेत.

या प्रश्नावर प्राधान्याने लक्ष द्यावे अशी मागणी ऊर्जामंत्र्यांकडे केली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पत्रकात म्हटले आहे. मागील वर्षी झालेले महसूल गोळा केला असताना यावेळी ही कामगारांवर वसुलीसाठी दबाव टाकला जात असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

मंडळाकडे केलेल्या मागण्यांमध्ये प्रमुख्याने वीज कामगार, अभियंते व अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देण्यात यावा, फ्रंटलाईन समजून कामगार अभियंते व अधिकारी व कंत्राटी कामगार सर्व प्रशिक्षणार्थी व त्याच्या कुटुंबीयांचे प्रथम लसिकरण करावे, कोव्हिड १९ मुळे मृत्य कामगारांना महाराष्ट्र शासनप्रमाणे अनुदान द्यावे, तिन्ही कंपन्यांकरिता एम.इंडिया या जुन्या टिपीए ची तात्काळ नेमणूक करावी, कोविड-19चा महाराष्ट्रात उद्रेक पाहता वीजबील वसूली करिता सक्ती करू नये आदी मागण्या मांडण्यात आले आहेत

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com