नाशिकमध्ये भाजप सत्तेबाहेर ठेवण्यासाठी 'महाविकास' व्यूहरचना

नाशिकमध्ये भाजप सत्तेबाहेर ठेवण्यासाठी 'महाविकास' व्यूहरचना

नाशिक || फारुक पठाण

नाशिक महापलिका निवडणूक (Nashik municipal corporation election) आता अगदी जवळ आली आहे. यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये ‘संवाद’ वाढला असून शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस (NCP) व काँगे्रस (Congress) हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीद्वारे (Mahavikas aghadi) निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहे. नाशिक मनपातदेखील महाविकास आघाडीने एक संघ होऊन निवडणूक लढवावी, अशी इच्छादेखील या तिन्ही पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी ‘मुंबई’ पर्यत पोहोचवल्याची माहिती मिळाली आहे...

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नव्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस व काँगे्रस या पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी तयार केली, महाराष्ट्र राज्याची सत्ता काबीज केली. सध्या या तिन्ही पक्षांचे उत्तम काम सुरू असल्याचे काही निवडणुकांवरुन दिसून येत आहे. यामुळे आगामी राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुकीसाठी देखील आपण एकत्रित राहून निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. पुण्यात तर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनीदेखील जाहीर कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केले होते.

नाशिक महापालिकेत 2012 ते 2017 या पाच वर्षाच्या काळात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एकहाती सत्ता होती. याकाळात मनसेनेचे शहरातील चार पैकी तीन आमदार देखील होते. यामुळे मनसेची सत्ता पुन्हा येणार असे बोलले जात होते, मात्र मात्र 2017 साली झालेल्या मनपा निवडणुकीत मनसेनेला जोरदार झटका लागला व त्यांचे 40 वरून नगरसेवक संख्या अवघ्या 5 वर आली.

यावेळी राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी नाशिकच्या प्रचार सभेत नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केल्याने अचानक वातावरण बदलले व भाजपचे कधी नव्हे इतके तब्बल 66 नगरसेवक निवडून आले, व मनपात एकहाती सत्ता स्थापन झाली.

आता राज्याचा कारभार महाविकास आघाडीकडे असून शिवसेना कार्य. अध्यक्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असून तिन्ही पक्षांनी समान कार्यक्रम तयार करुन त्याद्वारे सरकार चालवत आहे. मध्यंतरी काही निवडणुका महाविकास आघाडीने लढविण्यात येऊन चांगले यशदेखील प्राप्त केले आहे. यामुळे नाशिक मनपातदेखील महाविकास आघाडीनेच निवडणूक लढवण्याकडे अधिक कल असल्याचे जाणवत आहे.

राज्याची सत्ता असल्याने नाशिक मनपात देखील यंदा सत्ताबदल होणारच असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. गत काही काळात शिवसेनेने शहरात चांगले संघटन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, तर काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते निवडणूक कामाकडे विशेष लक्ष देत आहे. शिवसेना नेते संजय राऊत नाशकात सतत येऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आहे,तर पालकमंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनीदेखील चाचपणी सुरू केली आहे.

...तर आघाडी अपरिहार्य

भाजपा सत्तेपासून दुर करायचा असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नसल्याचा सुर काही नेत्यांनी काढला आहे. शहरातील चार विधानसभा मतदार संघांचा विचार केला तर आघाडी करणे योग्य राहणार असल्याचे मत देखील काही स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना कळविल्याचे समजते. मात्र वरिष्ठांकडून अद्याप तसे काही संकेत मिळालेले नसल्याचे दिसत आहे. यामुळे सध्या तरी सर्व पक्ष आपल्या पध्दतीने कामाला लागले आहे.

रचनेनंतर चित्र स्पष्ट

नाशिक मनपासाठी 133 वॉर्ड तयार करण्यात येऊन 43 तीन सदस्यी व 4 सदस्यी एक या प्रमाणे प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करुन नाशिक मनपा प्रशासनाने निवडणूक आयोगाला रवाना केला आहे. तर लवकरच प्रारुप आराखडा जाहीर होणार आहे. प्रभाग रचना यामुळे अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com