
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आपले संविधान महात्मा फुले (Mahatma Phule) यांच्या विचारांवर आधारित निर्माण झाले, पण आज काही कट्टरमतवादी समाज माणुसकीच्या विचारांवर घाला घालत आहे. त्यामुळे करोनाच्या (Corona) लढ्यात सर्व सामान्य माणसाचा जीव वाचण्यासाठी संविधातील तरतुदी पुढे आल्या. त्यामुळे सर्व घटकांना लस (Vaccine) मोफत उपलब्ध झाली, हे खरं महात्मा फुलेंच्या विचारांचे गमक आहे. म्हणून जगात महात्मा फुले श्रेष्ठ असल्याचे मत व्याख्याते नागेश गवळी यांनी व्यक्त केले...
महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार वितरण सोहळा व महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित अहमदनगर येथील व्याख्याते नागेश गवळी (Nagesh Gawli) यांचे व्याख्यान महाकवी कालिदास कला मंदिर येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, ऑल इंडिया सैनी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप नाईक, नाशिक गुड्स ॲण्ड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी,ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र पाटील, माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, माजी नगरसेवक बाळासाहेब जानमाळी, उद्योजक मनीष जाधव, माळी मंगल कार्यालयाचे अध्यक्ष बाजीराव तिडके, नीलिमा सोनवणे, कुसुम शिंदे, वर्षा नाथ उपस्थित होते.
गवळी म्हणाले की, महात्मा फुले ब्राम्हण विरोधी कधीही नव्हते. उलट धर्माची ठेकेदारी असणाऱ्या साम्राज्यवादाला त्यांचा विरोध होता. पण महात्मा फुले यांना सहकार्य करणारे देखील अनेक ब्राम्हण मित्र होते. त्यामुळे महात्मा फुले यांना बळ मिळाले. त्यामुळे आज त्यांचे विचार आत्मसात केले तरच आपण पुढे प्रगती करू शकतो, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय राऊत यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र शेवाळे यांनी केले. आभार उपाध्यक्ष उत्तमराव बडदे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, मार्गदर्शक उत्तमराव तांबे, कार्याध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर, उपाध्यक्ष उत्तमराव बडदे, सरचिटणीस हरिश्चंद्र विधाते, मयूर मोटकरी, प्रवीण जेजुरकर, प्रणव शिंदे, महेश गायकवाड, सातपूर विभाग अध्यक्ष रविंद्र माळी, सचिन दप्तरे, भास्करराव जेजुरकर, बाळासाहेब वाघ, दत्ता ढोले, प्रशांत वाघ, शंतनू शिंदे, गिरीश बच्छाव, गणेश हिरवे, बबलू भडके, मंगला माळी, चारुशीला माळी, संगीता अहिरे यांनी परिश्रम घेतले.