टीईटी प्रवेशपत्र २५ सप्टेंबरला जाहिर होणार

टीईटी प्रवेशपत्र २५ सप्टेंबरला जाहिर होणार

नाशिक | Nashik

इ. १ ली ते इ.५ वी व इ. ६ वी ते इ.८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/ विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे (Maharashtra State Education Council) १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) २ चे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी अधिकृत वेबसाइटवर mahatet.in वर नोंदणी सुरू आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे.

सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज (Online Application) भरण्याची प्रक्रिया दिनांक ०३/०८/२०२१ पासून सुरु झाली असून दि. २५ ऑगस्ट पर्यंत उमेदवार महाटीईटी २०२१ साठी अर्ज करू शकतात. अधिकृत नोटिफिकेशननुसार महाटीईटी २०२१ प्रवेशपत्र (TET Admit Card) २५ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न

१५० बहुपर्यायी प्रश्नांसाठी (MCQ) उमेदवारांना ९० मिनिटे दिली आहेत. प्रत्येक योग्य उत्तरासाठी, उमेदवारांना १ गुण तर चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग (Nigative Marking) नसणार आहे.

पात्रता परीक्षेमध्ये दोन पेपर आहेत. पेपर १ हा पहिली ते पाचवी इयत्तेसाठी आणि पेपर २ हा इयत्ता सहावी ते आठवीसाठी आहे. पेपर १ मध्ये इंग्रजी, मराठी, गणित, कॅम्पस स्टडी, पर्यावरण अभ्यास आणि बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, पेपर-२ मध्ये इंग्रजी, मराठी, बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, गणित आणि सामाजिक विज्ञान विषय आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com