सातपूर । Satpur

शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर महादेव मंदिर संस्थानच्यावतीने यंदाचा महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विश्वस्त समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

गंगापूर रोड परिसरातील श्री सोमेश्वर महादेव मंदिरात शहरात जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविकांच्या गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते.

यंदा मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मंदिर परिसरात गर्दी होवू नये याच पार्श्वभूमीवर ११ मार्च रोजी होणारा श्री सोमेश्वर महादेव मंदिर संस्थानच्यावतीने यंदाचा महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला.

१० व ११ मार्च या दोन दिवस मंदिर व परिसर भोवतालच्या परिसर सर्व भाविकांसाठी बंद राहणार आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करत भाविकांनी मंदिर व परिसरात गर्दी करु नये असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष अॅड. बापूसाहेब गायकर, सचिव बाळासाहेब लांबे, खजिनदार गोकुळ पाटील, राहुल बर्वे, प्रमोद गोरे यांनी केले आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला भाविकांची मोठी वर्दळ मंदिरात असतो. मंदिर परिसर अतिषय विलोभनिय असा आहे.