नाशिक | Nashik

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होणार्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार (दि.12) व रविवार (दि.13) राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे.

राज्यभरातून हजारो रिक्तपदे विविध नियोक्त्यांकडून उपलब्ध होत आहेत. 31 हजार रिक्तपदे 185 नियोक्त्यांकडून उपलब्ध झालेली असून 2500 उमेदवारांनी ऑनलाईन अॅप्लाय केले आहे.

यामधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती ऑनलाईन पध्दतीने मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्याचे नियोजित नियोक्त्यांकडून करण्यात येत आहे.

नियोक्त्यांकडून रिक्तपदे rojgar.mahaswayam com या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत.

यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणार्या किंवा ऑनलाईन अॅप्लाय केलेल्या सुयोग्य उमेदवारांच्या नियोक्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वरील वेबपोर्टलला लॉग-इन करावे. शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे.

13 डिसेंबर पर्यंत सदर प्रणालीवर दररोज नव-नवीन नियोक्त्यांची विविध रिक्तपदे उपलब्ध होत आहेत. यास्तव उमेदवारांनी दररोज महास्वयं मोबाईल अॅप्लीकेशन किंवा वेबसाईटवर लॉग-ईन होवून विविध रिक्तपदांना अॅप्लाय करावे जेणेकरून मुलाखतीच्या अनेक संधी उपलब्ध होवू शकतील.

रिक्तपदांसाठी पात्रतेनुसार अॅप्लाय करून लाभ घ्यावा असे आवाहन संपत चाटे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिक यांनी केले आहे..