कुच बिहार करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ बाद फेरीत

नाशिकचा शर्विन किसवेच्या ७० धावा
कुच बिहार करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ बाद फेरीत

नाशिक | Nashik

कुच बिहार करंडक स्पर्धेसाठी (Kuch Bihar Trophy competitions) महाराष्ट्र संघाने (Maharashtra Sangha) बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे. १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Regulators of Cricket in India) - बीसीसीआय (BCCI) तर्फे हि स्पर्धा आयोजित केली जाते. 

नाशिकच्या (nashik) डावखुरा सलामीवीर शर्विन उदय किसवे याने महाराष्ट्र संघातर्फे बहुमोल ७० धावा करुन सुरत (surat) येथे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विरुद्धच्या विजयात मोठा वाटा उचलला व आपली निवड सार्थ ठरविली. या उदयोन्मुख फलंदाजाने आता राष्ट्रीय पातळीवर देखील उत्तम कामगिरी केली आहे .

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे (Nashik District Cricket Association) रणजीपटु शेखर घोष हे या १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणुन जबाबदारी पार पाडत आहेत. शर्विनच्या महाराष्ट्र संघातील या कामगिरी मुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शर्विनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक :

महाराष्ट्र पहिला डाव - २२० , हिमाचल प्रदेश पहिला डाव - १६३. महाराष्ट्र दुसरा डाव - ३४० - शर्विन किसवे ७० . हिमाचल प्रदेश दुसरा डाव - १६०. महाराष्ट्र २३७ धावांनी विजयी.

Related Stories

No stories found.