कांदा दराप्रश्नी शेतकरी संघटना घेणार राष्ट्रपतींची भेट

कांदा दराप्रश्नी शेतकरी संघटना घेणार राष्ट्रपतींची भेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशात कांद्याच्या दरात (Onion Price) प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांना (Farmers) आपला कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावा लागत आहे...

कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने (Central Government) कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची दिल्ली (Delhi) येथे भेट घेऊन त्यांना साकडे घातले जाणार आहे.

यावेळी कांदा संघटनेकडून त्यांना एक टन कांदाही भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी दिली.

कांदा दराप्रश्नी शेतकरी संघटना घेणार राष्ट्रपतींची भेट
आदित्य ठाकरेंनी बांधलेला पूल गेला वाहून; एकनाथ शिंदेंनी दिले 'हे' आदेश

जगात चीननंतर (China) सर्वाधिक कांदा पिकवणाऱ्या आपला देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असतांना कृषीप्रधान अशी ओळख असलेल्या देशामध्ये कांद्याला सततचा मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान होत आहे.

ज्या ज्या वेळेस कांद्याचे थोडेफार दर वाढतात. त्यावेळेस कांदा निर्यात बंदी करणे, परदेशी कांदा आयात करण्यासाठी मर्यादा घालून देणे व्यापाऱ्यावरती धाडी टाकने अशा विविध क्लुप्त्या करून केंद्र सरकारकडून (Central Government) कांद्याचे बाजार भाव पाडण्याचे काम केले जाते.

कांदा दराप्रश्नी शेतकरी संघटना घेणार राष्ट्रपतींची भेट
दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त

भाववाढ झाल्यानंतर तात्काळ विविध प्रकारचे निर्बंध घालणारे केंद्र सरकार (Central Government) कांद्याचे भाव कमी झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांकडे (Farmers) पूर्णपणे दुर्लक्ष करत असून गेल्या 7 महिन्यांपासून कांद्याला (Onion) सतत उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असून आजमितीस शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला सरासरी 9-10 दहा रुपये प्रति किलो इतका कमी दर मिळत आहे

जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या आपल्या देशात विविध उद्योग व्यवसायांबरोबर शेतीचीही आर्थिक भरभराट होणे गरजेचे आहे. तरच आपला देश विकसनशील देशांमधून विकसित देश बनू शकतो, अन्यथा शेती क्षेत्रात सतत नुकसान होत राहिल्यास शेतकरी कायमच कर्जबाजारी राहून शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढू शकते.

कांदा दराप्रश्नी शेतकरी संघटना घेणार राष्ट्रपतींची भेट
नाशिकचे माजी नगरसेवक मातोश्रीकडे रवाना

देशामध्ये वाढत्या महागाईबरोबर शेतीसाठी लागणारे अवजारे, इंधन, खते, औषधे, बियाणे, मजुरी या सर्वांच्याच दरामध्ये वाढ झाल्याने कांद्याचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, गारपीट, ढगफुटी अशा विविध संकटांना तोंड देऊन राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जात असल्याने देशाची कांद्याची गरज भागवण्याचे काम कांदा उत्पादकांकडून केले जात आहे.

130 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात कांदा उत्पादकांच्या भरोशावरच देश कांद्यामध्ये स्वयंपूर्ण आहे. परंतु, अपवाद वगळता शेतकऱ्यांना कांदा पिकाला सतत उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे.

कांदा दराप्रश्नी शेतकरी संघटना घेणार राष्ट्रपतींची भेट
दारणा धरणातून 'इतक्या' क्युसेसचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जागतिक पातळीवरती भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याची नियमित बाजारपेठ मिळवून द्यावी तसेच देशांतर्गत कांद्याचे कमीत कमी दर निश्चित करून द्यावे,जेणेकरून शेतकऱ्यांना शास्वत नफा होईल.

केंद्र सरकारने देशाचे स्वतंत्र कांदा धोरण ठरवावे याबाबत राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांनी केंद्र सरकारला सूचना कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com