Maharashtra SSC Result : नाशिक विभागाचा निकाल 92.22 टक्के; विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव, पाहा फोटो

Maharashtra SSC Result : नाशिक विभागाचा निकाल 92.22 टक्के; विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव, पाहा फोटो

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल लागला. राज्याचा दहावीचा निकाल एकूण ९३.८३ टक्के लागला. नाशिक विभागाचा निकाल 92.22 टक्के लागला आहे....

दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९८.११ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे.

Maharashtra SSC Result : नाशिक विभागाचा निकाल 92.22 टक्के; विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव, पाहा फोटो
...अन् अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अडखळले, धडपडले आणि पडले! पाहा VIDEO

यंदादेखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी 95.87 तर मुलांची टक्केवारी 92.5 इतकी आहे. गेल्यावर्षी 10 वी निकाल 96.94 टक्के इतका होता यंदा मात्र तोच निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे. म्हणजे निकाल 3 टक्के कमी झाला आहे.

दरम्यान, संकेतस्थळावर निकाल (Result) जाहीर होताच नाशकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या. तर काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पास झाल्याचा आनंद दिसून येत होता. तसेच काही विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी मोबाईल तर काहींनी सायबर कॅफेवर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

Maharashtra SSC Result : नाशिक विभागाचा निकाल 92.22 टक्के; विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव, पाहा फोटो
Video : टीम इंडियाची नवी जर्सी पाहिलीत का?

सावरगाव | वार्ताहर | Savargaon

मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय, पिंपळगाव बसवंत शाळेतील विद्यार्थ्यांनी मार्च परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एसएससी परीक्षेसाठी एकूण 142 विद्यार्थी समाविष्ट झाले होते. 10 वी मार्च २०२३ चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा शेकडा निकाल 90.11 लागला असून त्यात विद्यार्थी 128 पास झाले आहेत.

विशेष प्राविण्य - 37

प्रथम श्रेणी - 55

व्दितीय श्रेणी - 28

उत्तीर्ण श्रेणी - 08

विद्यालयातील पहिले पाच विद्यार्थी

1) श्रावणी निलेश गवांदे 92.40

2) चेतन सुरेंद्र शेजवळ 90.00

3) सायली निलेश खैरे 89.40

4) संचीता दशरथ रूपवते 88.40

5) यशोधन संजय कहांडळ 88.00

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com