‘मसाप’च्या व्हर्च्युअल ग्रंथालयाला सहाशे दिवस पूर्ण

‘मसाप’च्या व्हर्च्युअल ग्रंथालयाला सहाशे दिवस पूर्ण
USER

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik Road

गेल्या दोन वर्षांत करोना (corona) महामारीमुळे साहित्य रसिकांना घरातून पडता आले नव्हते. त्यामुळे सकस व दर्जेदार साहित्यापासून ते दूर राहिले होते. या वाचकांची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) (Maharashtra Sahitya Parishad) नाशिकरोड (nashik road) शाखेने व्हर्च्युअल ग्रंथालय (Virtual library) हा विनाशुल्क उपक्रम (Free undertaking) करोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजेच 21 मार्च 2020 रोजी सुरु केला. नुकतेच या उपक्रमाने सहाशे दिवस पूर्ण केले आहेत.

मसापच्या या शाखेचे नाशिकरोड कार्यक्षेत्र असतानाही 454 सभासद तर व्हर्चुअल ग्रंथालय उपक्रमाचे जगभरातून दोन हजार सभासद झाले आहेत. कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, कार्यवाह रवींद्र मालुंजकर, कोषाध्यक्ष सुदाम सातभाई, दशरथ लोखंडे, धारा भांड यांनी सहकार्‍यांच्या मदतीने हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवला आहे.

महाराष्ट्र साहित्य संस्कृती (Maharashtra Sahitya Sanskriti) आणि संस्कृती मंडळ (मुंबई), महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन संस्था (Maharaja Sayajirao Gaikwad Research Institute) (औरंगाबाद), मसाप पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साकेत प्रकाशन आदींनी या उपक्रमासाठी मराठी (marathi), हिंदी (hindi), इंग्रजी (english) भाषेतील पुस्तके (books) उपलब्ध केली आहेत. त्यासाठी कोणतेही मानधन घेतले जात नाही.

मदतीची गरज

मसापची नाशिकरोड शाखा सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. त्यामुळे पुणे मसापने पहिली वैशिष्ट्यपूर्ण मसाप शाखा म्हणून गौरवही केला. संवाद सृजनाशी, मराठी राजभाषादिनी गुणवंत विद्यार्थी (srudents) सत्कार, कुंभमेळ्यात (kumbhmela) भाविकांना मदत, साहित्य संमेलनाध्यक्ष सत्कार, साहित्य संमेलन अनुभव कथन, शताब्दी स्मृती व्याख्यान, सांंस्कृतिक व संगीत कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन, काव्य स्पर्धा,

व्याख्यानमाला, सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीसाठी कायदा करण्यासाठी परिसंवाद आदी उपक्रम शाखेने राबविले आहेत. नाशिकरोडचे शेतकरी रामचंद्र शिंदे यांच्या आठ तसेच इतरांच्याही पुस्तकांचे प्रकाशन (Publication of books) मसापच्या या शाखेने केले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी दिल्लीपर्यंत या शाखेने प्रयत्न केले आहेत. व्याख्यानमाला ठेवली. आता गरूडझेप घेण्यासाठी या शाखेला दानशुरांची गरज आहे.

दर्जेदार पुस्तकांची मेजवानी

व्हर्च्युअल ग्रंथालय उपक्रमात सभासद व वाचकांना गाजलेली तसेच नवीन पुस्तकांची पीडीएफ (pdf) रोज न चुकता मेल आणि व्हॉटसअ‍ॅप (whatsapp) केली जाते. जयंती व अन्य विशेष दिनी वेगळी पुस्तके पाठवली जातात. दिनेश पैठणकर मिळालेल्या पुस्तकांची पीडीएफ करतात. उन्मेष गायधनी त्यांचा क्रम लाऊन जगभर मेल करतात.

श्रध्दा कोतवाल यांनी एकट्याने सातशे नवे सभासद जोडले आहेत. गोव्याचे लोकपाल न्या. अंबादास जोशी, महाराष्ट्राचे (maharashra) माजी धर्मदाय आयुक्त न्या. शशिकांत सावळे, माजी संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आदी मान्यवरांनी उपक्रमांचे कौतुक केले आहे. दोन संघटना व दोन ट्रस्टने या उपक्रमाचे अनुकरण केले आहे. आणखी संस्था ही पालखी वाहण्यासाठी पुढे येत आहेत.

परदेशातही प्रतिसाद

मसापाचा व्हर्च्युअल ग्रंथालय उपक्रम परदेशातही लोकप्रिय होत आहे. अमेरिका (51 सभासद), इंग्लड (4), जर्मनी (2), ऑस्ट्रेलिया (5), कॅनडा (4) आदी प्रगत देशांमध्येही प्रतिसाद मिळत आहे. मसापच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीची कीर्ती ध्वजा उंचावणारी नाशिकरोड शाखा एकमेव आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com