अचानक राज्यमंत्री बच्चू कडू जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होतात तेव्हा...

अचानक राज्यमंत्री बच्चू कडू जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होतात तेव्हा...
बच्चू कडूfile photo

नाशिक | प्रतिनिधी Nashik

प्रहार जनशक्ती संघटनेचे (Prahar Janshkati Sanghatna) सर्वेसर्वा आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Maharashtra minister of state bachhu kadu) यांनी अचानक जिल्ह्याधिकारी कार्यालयात (Collector office nashik) भेट दिली. यावेळी अनेक अधिकारी हजर नसल्याचे दिसून आले. यानंतर त्यांचा पारा अधिकच चढला....

यावेळी कोण अधिकारी आहे, त्यांचे नाव काय? कार्यालयात अनेक नागरिकांची गर्दी झालेली असताना ते अजून कर्तव्यावर का नाहीत अशी विचारणा करत तहसीलदारास चांगलेच धारेवर धरले. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिसरात चर्चेचा विषय झाला होता. यापूर्वीदेखील राज्यमंत्री कडू यांनी अनेक कार्यालयात भेट देत अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.

एकदा ते नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच (nashik municiple commissioner) चाल करून गेले होते. तेव्हापासून राज्यमंत्री कडू यांचा नाशिकला दौरा असला की अनेक अधिकाऱ्यांना धडकीच भरत असते. आज राज्यमंत्री बच्चू कडू नाशिक दौऱ्यावर आहेत. कुठलीही माहिती न देता त्यांनी त्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या तलाठी कार्यालय परिसरात नेला.

याठिकाणी अनेक नागरिक अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत त्यांना दिसून आले. दरम्यान, राज्यमंत्र्यांचा ताफा आल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. या ठिकाणी तहसीलदारास विचारणा करत माहिती जाणून घेतली. अनेक नागरिकांनी यावेळी बच्चू कडू यांच्याकडे तक्रारीदेखील केल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com