कुस्ती सामन्यात उपमहाराष्ट्र केसरी विजेता; चांदीची गदा बक्षीस

कुस्ती सामन्यात उपमहाराष्ट्र केसरी विजेता; चांदीची गदा बक्षीस

सटाणा । प्रतिनिधी | Satana

शहराच्या कुस्ती आखाड्यात (Wrestling arenas) सातार्‍याचा (satara) उपमहाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) किरण भगत (Kiran Bhagat) व दिल्ली केसरी बंटी कुमार (Delhi Kesari Bunty Kumar) यांच्यातील सामना अत्यंत रंगतदार ठरला.

सुमारे 11 मिनिटे दोन्ही पहिलवानांमध्ये निकराची झुंज झाली. त्यात भगतने बाजी मारली. यावेळी मैदानाबाहेर फटाक्यांची तुफान आतिषबाजी झाली तर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विजेत्याचे अभिनंदन केले.

माजी नगरसेवक दयाराम सोनवणे यांच्या स्मृत्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे (NCP City Working President Manoj Sonawane) मित्रमंडळ व मल्हार युवा प्रतिष्ठानच्या (Malhar Youth Foundation) संयुक्त वतीने शहरात महाराष्ट्र (maharashtra) व इतर राज्यातील नामांकित मल्लांना निमंत्रित करून कुस्त्यांची विराट दंगल (dangal) आयोजित करण्यात आले होती.

स्पर्धेसाठी पाठक मैदानावर 40 बाय 40 आकारात 5 फूट उंचीचा लालमातीचा आखाडा तयार करण्यात आला होता. निमंत्रित मल्लांची शहरातून भव्य मिरवणूक (Procession) काढण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांच्या हस्ते करण्यात आले.

खिरमाणे येथील बालाजी हनुमान मंदिराचे पुजारी पुरोहित जितेंद्रदास महाराज व प्रा.डॉ. धनंजय पंडीत यांच्या मंत्रच्चोरात उद्घाटन झाले. यावेळी पाठक मैदान गर्दीने खच्चून भरले होते. महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. कसमादे परिसरासह नाशिक जिल्हा (nashik district) व बाहेर गावांच्या तालीम संघाचे पदाधिकारी व मल्ल सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास लहान बक्षीसांच्या कुस्तींना प्रारंभ झाला. मुख्य आकर्षण असलेल्या कुस्तीपैकी पहिला सामना नांदेडच्या (nanded) राजू पाटील व मथुरा (mathura) येथील हरींदर गुजर यांच्यात बघावयास मिळाला.

अर्ध्यातासापेक्षा अधिक वेळ दोघा मल्लांमध्ये जिंकण्यासाठी स्पर्धा रंगली. दोघांमध्ये जिकरीची झुंज झाली. मात्र दोन्ही पहिलवान एकास एक सरस ठरत असल्यामुळे पंचांनी डाव थांबवून दोघांना स्पर्धकांना विजेते घोषित केले. कसमादे प्रोड्युसर कंपनीचे संचालक गणेश पवार यांनी दोघांना 41 हजाराचे बक्षीस विभागून दिले. दुसर्‍या सामन्यासाठी पुणे येथील नॅशनल चॅम्पीयन पल्लवी पोटफोडे (National Champion Pallavi Potphode) व इंटरनॅशनल चॅम्पीयन भाग्यश्री फड (International Champion Bhagyashree Phad) कुस्तीच्या आखाड्यात उतरले. दोन्ही महिला मल्लांमध्ये नेत्रदिपक सामना रंगला.

या सामन्यात भाग्यश्री विजयी झाली. तिला माजी कृउबा सभापती नानाजी दळवी यांच्या हस्ते 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. बजाज सिध्दी ऑटोचे संचालक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते आखाड्यात मथुरा येथील विनोद कुमार व हरियाना येथील रिंकू सिंग यांची कुस्ती लावण्यात आली, त्यात रिंकू सिंग विजयी झाला. त्यास 51 हजारांचे बक्षीस सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले. पंढरपूरचा संतोष जगताप व हरियानाचा रोहीत कुमार यांचा सामना पो.नि. विजय पवार यांच्या हस्ते लावण्यात आला.

या सामन्यात संतोष जगतापने बाजी मारली. त्याचा पो.नि. पवार यांच्या हस्ते 61 हजारांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. अकलूजच्या सचिन केचे व पुणे येथील विक्रम वडतीले यांच्या कुस्तीत विक्रम वडतीले विजयी झाला, त्यास 71 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. जालन्याचा विलास डोईफोडे व कोल्हापूरचा संतोष दोरवड या नामवंत मल्लांची रंगलेली झुंज प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरली. त्यांना प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. अखेर संतोष दोरवडने बाजी मारली. त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस नितीन सोनवणे यांच्या 1 लाखाचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फटाक्यांची तुफान आतिषबाजी करण्यात आली.

प्रेक्षकांचे लक्ष लागून असलेल्या सातारचा उपमहाराष्ट्र केसरी व दिल्लीचा बंटी कुमार यांना आखाड्यात पाचारण करताच प्रेक्षकांनी शिट्ट्या व टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. हलगीच्या गजरात दोन्ही मल्ल आखाड्यात उतरले. मान्यवरांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. दोघांमध्ये तब्बल 11 मिनट जिकरीची लढत झाली. त्यात दोघांकडून निरनिराळे डावपेच खेळण्यात आले. प्रेक्षकांच्या नजरा या लढतीने खिळून ठेवल्या. दोघांमधील निकराच्या झुंजीत कोण विजयी होतो, याचा अंदाज प्रेक्षकांकडून टाळ्या व शिट्यांच्या प्रतिसादातून मल्लांना मिळत होता.

हा सामना नेत्रदीपक व रोमहर्षक झाला. अखेरच्या क्षणी किरण भगतने बंटी कुमारला चितपट करुन विजयाची मोहोर उमटवली. त्याच्या विजयानंतर आखाड्याबाहेर फटाक्यांची तुफान आतिषबाजी झाल्याने परिसराला दिपावलीचे स्वरूप प्राप्त झाले होते. विजेत्या किरण भगतला मानाची चांदीची गदा व 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस माजी आ. संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, विजयराज वाघ, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार, पो.नि. विजय पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, आयोजक मनोज सोनवणे, नितीन सोनवणे, सागर सोनवणे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

सामन्यांचे पंच म्हणून क्रीडा शिक्षक सी.डी. सोनवणे, दिलीप देवरे, विठ्ठल बागुल, प्रकाश सोनवणे, नीलेश पाकळे, मुन्ना शेख, मंगेश खैरनार, जीवन सोनवणे आदिंनी काम पाहिले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ट्रिपल केसरी राज लोणारी, धुळे तालीम संघाचे अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शेतकी संघाचे चेअरमन प्रल्हाद पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, पो.नि. सुभाष अनमूलवार, मनमाडचे माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, मविप्र संचालक डॉ. प्रशांत देवरे, माजी नगरसेवक दिनकर सोनवणे,

रामू सोनवणे, दगाजी सोनवणे, माजी पं.स.उपसभापती वसंत भामरे आदींसह महाराष्ट्र कुस्ती मल्लविद्या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कुस्ती दंगल यशस्वीतेसाठी सागर सोनवणे, दीपक सोनवणे, अनिल सोनवणे, पप्पू सोनवणे, रामा पवार, मोती लाडे, अभिषेक हेडे, परेश देवरे, राहूल शेलार, बॉबी देवरे, गिरीश सोनवणे, निखील सोनवणे, रोहीत सोनवणे, छोटू सोनवणे, नितीन सोनवणे मित्रमंडळ व मल्हाररोड युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com