विभागीय महसूल आयुक्तालयात महाराष्ट्र दिन उत्साहात

विभागीय महसूल आयुक्तालयात महाराष्ट्र दिन उत्साहात

नाशिक | Nashik

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले....

याप्रसंगी अपर आयुक्त भानुदास पालवे (Additional commissioner bhanudas palave), अपर जिल्हाधिकारी तथा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका गीतांजली बाविस्कर (Gitanjali Baviskar), उपायुक्त (सामान्य प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त(महसूल) गोरक्षनाथ गाडीलकर, उपायुक्त (नियोजन) प्रदीप पोतदार, उपायुक्त (पुनर्वसन) दत्तात्रय बोरूडे, नगररचना, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, सहायक आयुक्त कुंदनकुमार सोनवणे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते....

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त कार्यालय नूतनीकरण झालेल्या विभागीय आयुक्त आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (Disaster management department) उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सचिन पाटील (sachin patil) यांनी उपस्थित अधिकारी यांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.