‘कायझेन’ स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व
नाशिक

‘कायझेन’ स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व

सीआयआयतर्फे नाशकात झाली व्हर्चुअल स्पर्धा

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी Nashik

कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने कायझेन स्पर्धा - विभागीय अंतिम फेरीचे ७ व्या स्पर्धेचे व्हर्च्युअल साधनांचा वापर करून आयोजित केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात यातील राज्यस्तरीय कायझेन स्पर्धांतील विजेत्या संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या विजेत्यांना व्हर्च्युअल पुरस्कृत करण्यात आले या स्पर्धेवर महाराष्ट्राचे वर्चस्व राहिले आहे मोठ्या उद्योग गटात गोदरेज अँड बॉईज तर लघु मध्यम श्रेणीत नितेश उद्योगाने पुरस्कार पटकावला आहे. सीआयआय उत्तर महाराष्ट्र चेअरमन दीपक कुलकर्णी यांनी विजेत्यांची घोषणा केली.

कायझेन ही एक अशी प्रणाली आहे जी केवळ कोणत्याही उद्योग संस्थेच्या वाढीस कारणीभूत ठरत नाही तर सेवकांचे मनोधैर्य देखील वाढवते, जे सहयोगी संबंधांचे चांगले उदाहरण ठरते. वचनबद्धता आणि कार्यक्रमानुसार वरून खालीपर्यंत कायझनमध्ये मानकांची स्थापना करणे आणि त्यानंतर उत्पादकता, गुणवत्ता, सुरक्षितता, वितरण, देखभाल आणि उत्पादन खर्च कमी करून सतत सुधारणा करणे यात समाविष्ट आहे. लहानसहान सुधारांमधून शेकडो रुपयांपासून कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकतो अश्या श्रेणीत येऊ शकते. सामान्यतः कायझेन कल्पना कामगार वर्गांकडून दिली जाते. कायझेनला गुंतवणूक नाही तर मोठी बचत किंवा उत्पादनक्षमतेत सुधारणा आपेक्षित आहे.

भारतीय उद्योग हे भरारी घेण्याच्या दिशेने मोठी पावले टाकत आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी आज बर्‍याच उद्योगांमध्ये जागतिक दर्जाचे मानके स्थापन करण्याची चढाओढ लागलेली असून, त्यांच्यातील सर्वोत्तम गुणवत्तापूर्ण उत्पादन निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली श्रम, संस्कृती रुजवण्यात ’कायझेन’ मोठे योगदान देणारी प्रणाली ठरु शकते,

- दीपक कुलकर्णी (चेअरमन, सीआयआय उत्तर महाराष्ट्र)

मोठ्या श्रेणीतील विजेते

प्रथम - गोदरेज अँड बॉयस एमएफजी कं.लि., (महाराष्ट्र)

द्वितीय - गुजरात गार्डीयन लिमिटेड, (गुजरात),

तृतीय - व्हीई कमर्शियल व्हेईकल्स लि.,(मध्य प्रदेश)

लघु मध्यम श्रेणीतील विजेते

नितेश उद्योग, (महाराष्ट्र)

Deshdoot
www.deshdoot.com