वातावरण जोरदार पावसाचे पण जोर घाटमाथ्यापर्यंतच

२१ जुलैपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
file photo
file photo

नाशिक । प्रतिनिधी Nashik

संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार ते अतिजोरदार पावसाची वातावरणीय प्रणाली विविध मॉडेलमधून दर्शवित असतांना गावा-दरगावा गाणिक पावसाच्या वितरणात कमालीच्या व अतिटोकाचा फरक सध्या जाणवत आहे. पावसाची (Rain) सर्व ऊर्जा घाटमाथ्यावरच वापरली जाऊन पुढील वर्षाच्छायेच्या प्रदेशात पाऊसमान कमी-अधिक होतांना दिसत आहे. पुढील संपूर्ण आठवडाच काय पण कदाचित २ आठवडे म्हणजे २१ जुलै पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता जाणवते,असा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तविला आहे...

ते म्हणाले, हवामान तज्ज्ञ स्वतःचे ज्ञान, अनुभव सध्य:स्थितीतील वर्तमान हवामान घटकांची असलेली वातावरणीय अवस्था पाहून हवामान शास्त्रतत्वाधारे अचूक, किचकट, खाचा खोचासहित विश्लेषण करत असतो.या सर्व गोष्टीचा वेध घेऊन त्या क्षणी निर्णयाप्रत येऊनच पावसाच्या अंदाजाचे अनुमान काढत असतो. सगळीच उत्तरे उपकरणे, रडार, उपग्रह चित्रे किंवा संगणकीय मॉडेल्स देत नसतात.

आता कठीण अशा किचकट व आव्हानात्मक हवामान तज्ञाने काढलेले अनुमान व व्यक्त केलेला अंदाज ह्यासाठी वातावरणातूनही तशी अनुमानित वातावरणीय प्रणाली प्रक्रिया निसर्गाकडून घडून येणेही अपेक्षित असते. पण कधी-कधी तसे घडून येत नाही. अन हे हवामान तज्ञांना आज आव्हान जाणवू लागले आहे.

जेथे पाऊस पडतो ते शेतकरी म्हणतात बरोबर व जेथे काहीच नाही ते उदासीनतेत असतात. शेजारी भरपूर तर माझ्याकडे काहीच नाही. असे शेतकरी गोंधळून जातात. हवामान खाते,प्रसार माध्यमे, सर्व त्यांच्या जागेवर योग्य असतात पण प्रत्यक्षात शंभर टक्के अपेक्षित परिणाम त्यानुसार कधी कधी त्यांना दिसत नाही, हे एक विदारक सत्यही सध्या जाणवू लागले आहे. हवामान शास्रलाही हे आव्हानच होत आहे.

महाराष्ट्रातील सुशिक्षित तज्ञ् शेतकरीही बुद्धीचा कस लावून, पूर्णपणे विवेकता वापरून, आवाहनानुसार कृषी व हवामान तज्ञांचा सल्ल्यानुसारच पेरणी नियोजन करत असतो. आणि यावर्षीही तसेच केले आहे. तरीदेखील फसवले गेल्याची भावना काहींच्या मनी येते.

आजही पुढील ५ दिवस म्हणजे मंगळवार १२ जुलै पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून व अरबी समुद्र तटीय ट्रफ, शिअर झोन वाऱ्यांची स्थिती अनुकूल अश्या वातावरणीय प्रणालीनुसार जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहेच. त्यात बदल नाही. इतके जबरदस्त वातावरण असतांना पाऊस व्हायलाच हवा असे हवामान तज्ञाच्या अनुमानंती येते. हा अंदाज व वरील विवेचनानुसारील स्थिती हा जाणवणारा विरोधाभास ह्याचीही नोंद शेतकऱ्यांच्या मनी असावी असे वाटते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com