महाराष्ट्र चेंबर करणार टास्क फोर्सची निर्मिती

महाराष्ट्र चेंबर करणार टास्क फोर्सची निर्मिती
करोना महाराष्ट्र

सातपूर । Satpur

व्यापार, उद्योग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री, मुख्यसचिव, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांना व्यापारी व उद्योजकांच्या मागण्याचे निवेदन देणे, व्यापारी उद्योजकांच्या अडचणींबाबत सरकारकडे प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींचा टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या झूम बैठकीत घेण्यात आला.

राज्य सरकारने 31 मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केल्यामुळे व्यापार व व्यावसायिक क्षेत्रात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

या संभ्रमाबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे ऑनलाइन बैठक घेण्यात आली. चेंबरचे विश्वस्त खुशालभाई पोद्दार, माजी अध्यक्ष दिग्विजय कपाडिय, माजी अध्यक्ष हेमंत राठी, महाउद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी आपलेेे मत व्यक्त केले. नाशिकमध्ये व्यापारावर आज एक लाख कुटुंब अवलंबून आहेत. त्यामुळे व्यापार उद्योग लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे.

मुख्यमंत्री, मुख्य सचिव, पालकमंत्री, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दोन दिवसात निवेदन द्यावे, असा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देणार असून केलेल्या चर्चेची माहिती आयमा पदाधिकार्‍यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com