महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचे निधन

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचे निधन

नाशिक l प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे (Maharashtra Chamber of commerce) माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया (ex president digvijay kapadia) वय 76 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. (Passes away)

अशोका मेडीकव्हर रुग्णालयात(ashoka medicover hospital) किडनी व हृदयविकाराच्या त्रासावर ते उपचार घेत होते रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

उत्साही, मितभाषी, जनसंपर्क वाढविण्यावर विशेष भर ठेवणारे असे हे व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय व शासन स्तरावर त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. चतुरंग अभ्यास असल्यामुळे कोणत्याही विषयावर प्रबोधन करण्यामध्ये त्यांचा विशेष हातखंडा होता.

दिग्विजय कापडिया यांनी ऑल इंडिया क्लॉथ मर्चंट फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून (all india cloth federation) व्यवसायिकांच्या न्याय हक्कासाठी सुमारे तीस ते चाळीस वर्षांपासून लढा दिला होता.

२०१० साली त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष पदा चि धुरा सांभाळली होती तत्पूर्वी महाराष्ट्र चेंबूर चे उपाध्यक्ष पदावर त्यांनी नाशिकला कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाची शुभारंभ केला होता.

पंचवटी येथील आर पी विद्यालयाचे अध्यक्षपदावरुन ही त्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगले काम उभे केले होते. जकात विरोधी आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. आयकर उपभोक्ता सल्लागार समितीवर त्यांनी अनेक वर्षे काम केले.

रेल्वेच्या विभागीय व झोनल समिती सदस्य म्हणून अनेक वर्षांपासून काम करीत होते. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकल्प उभे करण्यामध्ये पुढाकार घेत मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे अनेक क्षेत्रात प्रशिक्षण देण्यामध्ये ते नेहमी अग्रेसर राहत होते

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com