येत्या शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष नाशिक दौऱ्यावर

येत्या शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (BJP Maharashtra President MLA Chandrakant Patil) १७ व १८ जुलै रोजी नाशिक दौर्‍यांवर (Nashik Tour) येणार आहेत. याबाबतची माहिती भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे (BJP Nashik President Girish Palave) यांनी दिली. संघ समन्वयक शाखेत ते भेट देणार आहेत. तसेच शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत...

असा आहे दौरा

दि.१७ रोजी सकाळी साडेसात वाजता संघ समन्वय शाखा- शंकराचार्य संकुल, गंगापुर नाका, साडेआठला संघ पदाधिकारी समवेत बैठक त्यांची होणार आहे.

सव्वा दहाला महानगर पदाधिकारी (उपाध्यक्ष व चिटणीस यांची बैठक ११.ते १२-व्यक्तीगत भेटी होणार आहेत. त्यानंतर महानगर अध्यक्ष, चार सरचिटणीस यांच्या बरोबर, दुपारी १२. ते १.३० दहा मंडल अध्यक्ष बैठक, दुपारी २.३० ते ३ वाजेपर्यंत होणार आहे.

वसंतस्मृती कार्यालय- मोर्चा, आघाडया व प्रकोष्ठ पदाधिकारी समवेत बैठक तसेच सायंकाळी ५. ते ७. .व्यक्तीश: भेटी (Vasant Smruti Karyalay)

भाजपा वसंतस्मृती कार्यालय येथे आ. देवयानी फरांदे, सरचिटणीस प्रदेश, बाळासाहेब सानप, उपाध्यक्ष, .लक्ष्मण सावजी, .विजय साने, ,आ.ै.सीमा हिरे, .राहुल ढिकले, महापौर .सतिष कुलकर्णी, सभागृह नेते कमलेश बोडके, अरुण पवार, गणेश गिते, यांच्याशी चर्चा त्यानंतर सायंकाळी सातला माजी आमदार बाळासाहेब सानप (Former MLA Balasaheb Sanap) यांच्या निवासस्थानी भेट ते देणार आहेत.

दि.१८ रोजी सकाळी.सतिष कुलकर्णी,(Nashik Mayor Satish Kulkarni) यांचे निवासस्थानी भेट ते देतील. त्यानंतर ११. ते १२. वा.-पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी १.०० ते ३.०० वा.-.गिरीष पालवे,देवयानी फरांदे (Deoyani Pharande), बाळासाहेब सानप,(Balasaheb Sanap) लक्ष्मण सावजी (Laxman Sawaji) .विजय साने (Vijay Sane), ज्येष्ठ नेते,आ.सीमा हिरे (MLA Seema Hire), पश्चिम विधानसभा, आ. राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale), पुर्व विधानसभा, सतिष कुलकर्णी, महापौर, मनपा नाशिक, कमलेश बोडके, सभागृह नेते, मनपा नाशिक, अरुण पवार, गटनेते, मनपा नाशिक, गणेश गिते यांच्या सोबत एकत्रीत बैठक होणार आहे.

यानंतर दुपारी ३.०० ते ७.०० वा. भाजपा ग्रामीण जिल्हा, पदाधीका़र्‍यांंशी चर्चा, १९ जुलै २०२१-नियोजित जिल्हयात संघटनात्मक प्रवास असल्याचे पालवे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com