Video : मनमाडमध्ये शुकशुकाट

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथे शेतकऱ्यांसोबत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मनमाड शहर परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे...

आज (दि. ११) सकाळी शिवसेना (shivsena), काँग्रेस (congress), राष्ट्रवादी काँग्रेससोबत (ncp) इतर पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी फेरी काढून बंदचे आवाहन केले.

यावेळी व्यापारी व नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. बंदमध्ये बाजार समितीदेखील सहभागी झाली. त्यामुळे बाजार समितीच्या मैदानात शुकशुकाट दिसून आला. बंदच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरदेखील कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.