महाराष्ट्र बंद : पेठ तालुक्यात संमिश्र प्रतिसाद

महाराष्ट्र बंद : पेठ तालुक्यात संमिश्र प्रतिसाद

पेठ | Peth

उतर प्रदेशात (uttar pradesh) शेतकरी आंदोलकावर झालेल्या हल्ल्याचे निषेधार्थ भाजपवगळता (bjp) सर्वपक्षीय महाराष्ट्र बंदला (maharashtra bandh) संमिश्र प्रतिसाद मिळाला...

शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, माकप, आरपीआय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेठ शहरातून रॅली काढून पंचायत समितीसमोरील चौकात केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

यावेळी याकुब शेख, नामदेव मोहंडकर, मनोज घोंगे, भिकाजी चौधरी, रामदास गवळी, दामू राऊत, संतोष डोमे, मोहन गावंढे, राजाराम पवार, विशाल जाधव, शाम गावित, पं. स. सभापती विलास अलबाड, मोहन कामडी, किरण भुसारे, जाकीर मनियार, अशोक ताठे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सपोनि एस. सी. वसावे यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

Related Stories

No stories found.