वर्दळीच्या दुधबाजारसह जुन्या नाशकात शुकशुकाट; बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

वर्दळीच्या दुधबाजारसह जुन्या नाशकात शुकशुकाट; बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published on

जुने नाशिक | Old Nashik

त्रिपुरा (Tripura) येथे झालेल्या जातीय दंगलीत मुस्लिम समाजावर मोठ्याप्रमाणात अन्याय झाला असून काही कट्टरपंथी संघटनांती पैगंबर साहेब (Hazrat Muhammad Paigamber saheb) यांच्याबद्दल अपशब्ध वापरल्याने धार्मिक भावना दुखावली आहे. आज महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक रजा अकॅडमीसह (raja academy) काही मुस्लिम संघटनांनी दिली आहे....

नाशिकमध्येही मुस्लिम समाज (nashik muslim community) दुकाने बंद करुन सहभागी होणार आहे. केंद्र सरकाराने त्वरीत यातील दोषींवर कडक कारवाई करावी, यापुढे असे प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, पिडीत मुस्लिम कुटुंबियांना त्वरीत मदत मिळावी. अशा मागण्या मुस्लीम समाजाकडून करण्यात आल्या आहेत.

नाशिकमधील सर्व प्रकारचे हॉटेल, मिठाई दुकाने, दुध विक्री केंद्र तसेच रिक्षा चालक आदींनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे.

मुस्लिम बांधव स्वयस्फुर्तीने बंदमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी कोणत्याही प्रकारची रॅली किंंवा निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले नाही.

शहरातील मुस्लिम बहुल जुने नाशिक परिसरातील बागवानपुरा, कथडा, नानावली, चौक मंडई, अशरफी चौक, बुरड गल्ली, कोकणीपुरा, दख्नीपुरा, मुल्तानपुरा, जोगवाडा, पिंजारघाट, दुध बाजार, शहीद अब्दुल हमीद चौक, शहीद इ्नबाल चौक, हेलबावडी, खडकाळी, इमाम अहमद रजा चौक, मोहम्मद अली रोड,

वडाळागांव व परिसर, गंजमाळ, सारडा सर्कल, मदिना चौक, मौलाना आझाद रोड, वडाळानाका परिसर, कुरैशी नगर परिसर, आजाद नगर परिसर, रहेनुमा नगर, पखालरोड, काझीनगर, उस्मानिया चौक, काझीपुरा, आझाद चौक,

नाईकवाडीपुरा, अजमेरी चौक, चव्हाटा परिसर, आदम शाह, बडी दर्गा शरीफ परिसरासह भद्रकाली आदी भागातील मुस्लिम बांधवांनी व्यवहार बंद ठेवत बंद पाळल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com