मविआतर्फे महाराष्ट्र बंदची हाक

मविआतर्फे महाराष्ट्र बंदची हाक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखिमपुर खिरी (Lakhimpur khiri) येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने आज (दि. ११) रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे

शिवसेना (shiv sena), काँग्रेस (congress) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (rashtravadi congress) वतीने व्यापारी व दुकानदारांना महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस (police) यंत्रणा सज्ज असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

बंद मध्ये जनतेने सहभागी व्हावे - जिल्हा काँग्रेसचे आवाहन

उत्तर प्रदेशातील लखिमपुर खिरी येथील शेतकऱ्यांना (farmer) भाजपाच्या (BJP) योगी सरकारने (Yogi Government) चिरडून टाकल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंद मध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे (Congress Committee) करण्यात आले आहे. भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा सर्व स्तरावर तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर भाजपच्या केंद्र सरकार (central government) व भाजपशासित राज्यांकडून सातत्याने अन्याय व अत्याचार होत आहेत.

अशा क्रूर अत्याचारी भाजप सरकार (BJP Government) विरोधात संपूर्ण देशभर आंदोलन (Movement) सुरू आहेत. या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन नाशिक जिल्हा (Nashik District) कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Congress President Tushar Shevale), शरद आहेर (sharad aaher), आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar), राजाराम पानगव्हाणे (Rajaram Pangavhane), जयप्रकाश छाजेड (prakash chajed), डॉ. शोभा बच्छाव (Dr. Shobha Bacchav), शिरीष कोतवाल (shirish kotval), अनिल आहेर, डॉ. हेमलता पाटील, संपत सकाळे, रमेश कहांडोळे, संदीप गुळवे, ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, गोपाळ लहांगे आदींनी केले आहे.

बंद यशस्वी करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे आवाहन

शेतकऱ्यांवर झालेल्या निर्घृण हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे उद्या ( दि.११ ) महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे नाशिक मधील व्यापाऱ्यांना बंद ला साथ देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. एका मंत्र्याच्या मुलाने असे कृत्य करणे व त्या मंत्र्यांचा अद्यापपर्यंत राजीनामा न घेण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त करीत नाशिककरांनी हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव, अपुर्व हिरे, गजानन शेलार, नाना महाले, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार आदींनी केले आहे.

बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना सज्ज

शिवसेनेच्यावतीने आजच्या भारत बंदसाठी ठिकठिकाणी व्यावसायिकांशी संवाद साधून बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला महाविकास आघाडीने पाठींबा दर्शवला असल्याने काल दिवसभर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शहर परिसरात व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. शिवसेनेच्यावतीने पक्षाच्या सेना मुख्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती.

यावेळी बंद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर काल दिवसभर शहर परिसरातील व जिल्हातील शिवसैनिकांनी आपापल्या भागात जाऊन सोमवारच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी महानगप्रमुख सुधाकर बडगूजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनते विलास शिंदे, विनायक पांडे, सुनिल बागूल यांनी पदाधिकार्‍यांनी बंद यशस्वी करण्यासाठी आवाहन केले.

आम्ही जनतेसोबत : मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) कायम जनतेसोबत राहिली आहे. करोनामुळे (corona) अगोदरच लोकांचे खूप हाल झालेले आहेत, तर दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठला आहे. अशा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या सामान्य नागरिकांना धीर देण्याची गरज आहे. अशा वातावरणात बंद नागरिकांना परवडणारा नाही. तरीही नागरिकांना जे हवे आहे त्याच्या सोबत आम्ही राहणारच, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) तर्फे शहराध्यक्ष दिलीप दातीर (Dilip Datir) यांनी मांडली आहे.

दरम्यान, शहरासह जिल्हाभरात मविआतर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची कुमक ठिकठीकाणी बंदोबस्तासाठी हजर राहणार आहे. प्रामुख्याने मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन, शालीमार येथील सेना भवन तर महात्मा गांधी मार्गावरील कॉंग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर बंदोबस्त असणार आहे. तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणी देक्खील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.