महाराष्ट्र बंद : कसबे सुकेणेत कडकडीत बंद

महाराष्ट्र बंद :  कसबे सुकेणेत कडकडीत बंद

कसबे सुकेणे | Kasabe Sukene

लखीमपुर खिरी (lakhimpur kheri) येथील शेतकऱ्यांच्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने (mahavikas aghadi) महाराष्ट्रात बंद पुकारला आहे...

या बंदला कसबे सुकेणे ता. निफाड व परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शिवसेना (shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व काँग्रेस (congress) पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सर्व व्यापारी संघटना, व्यावसायिक व नागरिकांनी प्रतिसाद देत कसबे सुकेणे बंद ठेवण्यात आला.

आज सकाळपासूनच सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल, दूध संकलन केंद्र, कृषी संदर्भात औषध दुकाने, शाळा व महाविद्यालय वगळता बहुतांश व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला आहे.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी सर्व व्यापारी, दुकाने व नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी प्रतिसाद देत शंभर टक्के बंद पाळला.

छगन जाधव, माजी सरपंच, कसबे सुकेणे

लखीमपुर येथील घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गावकऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के बंद पाळला आहे.

नाना पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कसबे सुकेणे.

Related Stories

No stories found.