महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्र विकासाला अर्थसंकल्पात स्थान

महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्र विकासाला अर्थसंकल्पात स्थान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात (budget of Maharashtra) गेली 75 वर्षानंतर महानुभाव पंथाच्या (Mahanubhav Panth) तीर्थक्षेत्राच्या विकासाला (Pilgrimage development) स्थान देण्यात आले असून,

अष्टजन्म शताब्दीच्या निमित्ताने सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी मराठी भाषा विद्यापीठ (Marathi Language University) स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर (Legislative Assembly Speaker Milind Narvekar) यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांनी महानुभाव पंथासाठी व मराठी भाषीका साठी महत्वपूर्ण घोषणा केल्याबद्दल त्यांचे विधान भवनात महानुभाव पंथाच्या वतीने विशेष सत्कार करुन ऋण निर्देश व्यक्त करण्यात आले.

महानुभाव पंथाच्या गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला मुर्त स्वरुप मिळाल्याबद्दल यावेळी सर्वांसोबत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली त्यात कवीश्वर कुळाचार्य प.पू.प.म.कारंजेकर बाबा, अ.भा.म.परिषद अध्यक्ष प.पू.प.म.वीद्वांसबाबा, यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले. यातून समाजाच्या प्रसार प्रचाराला खर्‍या अर्थाने गती मिणार आहे. सेवेकर्‍यांना यामुळे खरे समाधान लाभल्याचे सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत महंत कापूसतळनीकर बाबा, महंत वायंदेशकर बाबा, रिद्धपूर महंत कान्हेराज बाबा,रोही पींपळगाव पू.श्री.प्रकाशमामा विद्वांस,पु.श्री. युवराजशास्त्री(पारगाव शिंगवे),पू.श्री. चिरडे बाबा( निफाड),पू.श्री मूकुदराजदादा अंकुळनेरकर, पू.श्री आकाशमूनी मेहकरकर तसेच दिनकर पाटील, बाळासाहेब सानप, प्रकाश नन्नावरे, नरेन्द्र आमधर( नागपूर), विजय भरबत(नागपूर) मोहनराव अपूने व उल्हास तापकीरे (अमरावती) आदींनी महानुभाव पंथाच्या विविध कार्यक्रमांची माहीती दिली. यावेली महानुभावपंथांचे प्रचारक व सेवेकर्‍यांनी निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com