महालक्ष्मी चाळ दंगल : सहा संशयित १५ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत; तीन फरार

महालक्ष्मी चाळ दंगल : सहा संशयित १५ फेब्रुवारीपर्यंत कोठडीत; तीन फरार

जुने नाशिक | प्रतिनिधी

येथील महालक्ष्मी चाळ दंगल व खून प्रकरणातील नऊ पैकी सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले...

दरम्यान एक संशयित जखमी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून एक अद्याप फरार आहे, तर एकाला आज पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्याला उद्या कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास सशस्त्र दंगल प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत, या दंगलीत एक ठार व दोन युवक गंभीरपणे जखमी झाले आहेत.

या दोन्ही गटांमधील सहभागी काही संशयितांविरुध्द भद्रकालीसह अन्य पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दंगलीचा मुख्य सुत्रधार तसेच खुनातील संशयित तडीपार गुंड विशाल बेनवाल याच्याविरुध्द शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे दाखल असून त्यास पोलीस उपआयुक्तांकडून नाशिक शहर व जिल्ह्यातुन तडीपार करण्यात आले होते; मात्र तरीही तो जुने नाशिक भागात वावरत होता.

खुनाची घटना घडल्यानंतर विशाल हा त्याचा साथीदार अभयसोबत शहरातुन फरार झाला. त्याच्या मागावर असलेल्या भद्रकाली गुन्हे शोध पथकाने मुंबईतील माटुंगामधून मुसक्या बांधल्या. तसेच अभय बेनवाल यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

दंगलप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी आतापर्यंत आठ संशयित गुन्हेगारांना अटक केली असून केवळ एक संशयित फरार आहे. त्यालाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांनी सांगितले. दत्त पवार अधिक तपास करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com