तीर्थराज कुशावर्तवर गोदावरी नदीची महाआरती

तीर्थराज कुशावर्तवर गोदावरी नदीची महाआरती

त्र्यंंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar

ओम शंभव प्रतिष्ठान (Om Shambhav Pratishthan) आणि नगरपालिकेच्या (Trimbakeshwar town council) वतीने गोदावरी महाआरती तीर्थराज कुशावर्तवर (Tirthraj Kushavarta) झाली. यावेळी दीपोत्सव (Dipostav) साजरा करण्यात आला.

आजादीका अमृत महोत्सव व नदी उत्सव या कार्यक्रमा अंतर्गत गोदावरीची महा आरती करण्यात आली. गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी यावेळी शपथ घेण्यात आली.

या वेळी पालिकेचे विविध विभागातले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. गोदावरीचे मुख्य पूजन नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक केले. यावेळी नगरसेवक शामराव गंगापुत्र ट्रस्टचे एन् . डी .गंगापुत्र उपस्थित होते.

दरम्यान केंद्र शासनाने नदी संवर्धन कार्यक्रम त्रंबकेश्वर पासून म्हणजे गोदावरीचे उगमस्थान ब्रह्मगिरी पासून सुरु करावा,अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com