नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य रांगोळी

नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य रांगोळी

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

गुढीपाडवा ( Gudhipadava)अर्थात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, पहिला सण. यानिमित्ताने नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे स्वातंत्र्याची 75 वर्षे या संकल्पनेवर आधारित नाशिकरोड येथील मुक्तीधाम ( Muktidham - Nashikroad )प्रांंगणात भव्यदिव्य रांगोळी ( Rangoli ) काढून नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत.

नाशिकरोड येथील मुक्तीधाम मंदिराच्या प्रागंणात 75 बाय 30 फुटाची रांगोळी साकारली आहे. 50 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून अथक परिश्रम घेत यांनी ही सुबक रांगोळी साकारली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. याच संकल्पनेवर आधारित यंदाचे हे वर्ष विविध कार्यक्रमांनी गाजते आहे. प्रत्येक वीरांगनांनी देशभक्तीने पेटून उठून या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान दिले. यांचे यानिमित्ताने स्मरण करत रांगोळीच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे

.

हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त जेडीसी बिटको चॅरीटेबल ट्रस्टचे जगदीश चौहाण आणि नववर्ष स्वागत यात्रा नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य रांगोळी साकारण्यात आली. पूजा अष्टेकर, सारिका मंचेकर, योगिता बारापात्रे, प्रणिता पाडळकर, मंदाताई मुदलियार, नलिनी कड, अमी छेडा, सीमा कासलीवाल, माधवी नाईक, वैशाली गवळी, शीतल काळे आदि महिला सहभागी झाला होत्या. नाना पाटील, गोपाल लाल, सुरेश जठार यांनी मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.