त्र्यंबक नगर परिषद
त्र्यंबक नगर परिषद
नाशिक

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी माधवी भुजंग

ऑनपद्धतीने निवड

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwer

त्र्यंबक नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी सौ माधवी भुजंग यांची आज सकाळी ऑन लॉइन पद्धतीने निवड झाली. त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिका हायटेक झाली अशी प्रतिक्रया उमटली आहे.

सौ. माधवी भुजंग या भाजपच्या नगरसेविका आहेत. उपनगराध्यक्ष दीपक लोणारी यांनी रोटेशन पद्धतीने पदाचा राजीनामा दिल्याने ही निवड बिनविरोध झाली.

निवडणूक निवडीचे कामकाज मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी पहिले पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगवकर यांनी भुजंग यांच्या निवडीची घोषणा केली. उमेदवारी अर्ज सादर करतांना नगरसेवक स्वप्नील शेलार, नगरसेवक कैलास चौथे तसेच संतोष भुजंग उपस्थित होते.

पालिका संगणक विभागाच्या सौ दीपाली चौरे यांनी यासाठी खास अँप तयार केले होते. ते नगरसेवकाच्या मोबाइल मध्ये लोड करण्यात आले होते. सभागृहा बाहेर सोशल डिस्टन्स राखून नगरसेवक नगरसेविकानी सौ भुजंग यांचे अभिनंदन केले

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com