म. गांधी विद्यामंदिरमुळे सांस्कृतीक वैभवात भर : अभिषेकी

म. गांधी विद्यामंदिरमुळे सांस्कृतीक वैभवात भर : अभिषेकी

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

आजवर आम्ही पुणे शहरालाच सांस्कृतिक भूमी (Cultural land) म्हणून ओळखत आलो. परंतु गायन स्पर्धेनिमित्त (Singing competition) मालेगावात आल्यानंतर सांगीतिक व सांस्कृतिक चळवळीचे जतन आणि संवर्धनासाठी हिरे कुटुंबीयांची मेहनत बघून भारावलो.

मालेगाव शहराच्या सांगीतिक व सांस्कृतिक वैभवात महात्मा गांधी विद्यामंदिर (Mahatma Gandhi Vidyamandir) संस्थेचे योगदान वाखाणण्याजोगे असल्याचे गौरवोद्गार ख्यातनाम शास्त्रीय संगीत गायक पंडित शौनक अभिषेकी (Classical music singer Pandit Shaunak Abhishek) यांनी काढले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे (Savitribai Phule Pune University Pune), विद्यार्थी विकास मंडळ व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या संयुक्त वतीने आयोजित महिलारत्न पुष्पाताई हिरे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन गायन स्पर्धेच्या (State level inter-collegiate singing competitions) पारितोषिक वितरण समारंभात विशेष अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करतांना पं. शौनक अभिषेकी बोलत होते. र्काक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या समन्वयक संपदा हिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी डॉ. व्ही.एस. मोरे, आदिवासी सेवा समितीचे सहसचिव राजेश शिंदे, प्राचार्य डॉ. दिनेश शिरूडे, प्राचार्या डॉ. उज्ज्वला देवरे, प्राचार्य सुभाष निकम, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्व. लता मंगेशकर (Late. Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशेष अतिथी पं. शौनक अभिषेकी यांचा संपदा हिरे यांनी सत्कार केला. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या नियतकालिकाचेही प्रकाशन झाले. याप्रसंगी बोलतांना संपदा हिरे यांनी सांगीतिक कार्याच्या माध्यमातून मालेगावचे (malegaon) नाव देशपातळीवर उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. आमच्या हिरे घराण्याला राजकीय वारसा असला तरी संगीतामुळे लोकांचे विचार बदलतात, माणूस संवेदनशील होतो. त्यामुळेच म. गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे यांनी मालेगावच्या महिला महाविद्यालयात संगीत विभाग सुरू करून संगीताचा प्रचार व प्रसार सुरू केला. संगीताचे स्वतंत्र महाविद्यालय देखील सुरू केल्याचे नमूद केले.

स्पर्धेचे उद्घाटन सकाळी मसगा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे यांच्या हस्ते झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व गटातून 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील गटनिहाय प्रथम तीन विजेते पुढीलप्रमाणे आहेत. उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायन स्पर्धा : अथर्व वैरागकर, शितल गद्रे, स्वरांजली पाटील. उपशास्त्रीय गायन स्पर्धा : शितल गद्रे, अथर्व वैरागकर, संध्या कोटकर. भारतीय सुगम संगीत गायन स्पर्धा : स्वरांजली पाटील, राजश्री कुलकर्णी, अथर्व वैरागकर, पाश्चात्त्य सुगम संगीत गायन स्पर्धा : निसर्ग गायकवाड, शितल गद्रे, सारा मॅथ्यू, समूहगीत गायन स्पर्धा : गौरव बेरड व ग्रुप,

आफताब शाह व ग्रुप, राजश्री कुलकर्णी. पाश्चात्त्य समूहगीत गायन स्पर्धा : सैयदअली शाह ग्रुप, राजश्री कुलकर्णी व ग्रुप, अभय मोरे व ग्रुप. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फिरता चषक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अथर्व वैरागकर याने पटकावला. स्पर्धेत एकूण 1 लाख 50 हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैजयंती राठी यांनी केले तर शेवटी प्रा. नवनिता देसले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.डी.जी. जाधव, डॉ.दिलीप पवार, प्रा. अशोक जाधव, डॉ. वैजयंती रामावत, प्रा. अस्मिता सेवेकरी आदिंनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.